Mouni Roy
Mouni Roy  esakal
मनोरंजन

मौनी लग्न झालं तुझं, असं वागणं!, त्या फोटोंनी वाढलं टेम्परेचर!

सकाळ डिजिटल टीम

Tv Entertainment: टीव्ही मनोरंजन क्षेत्रामध्ये आपल्या बोल्डनेसनं कायमच (Social Media Viral News) चाहत्यांचे लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री म्हणून मौनी रॉयच्या (Mouni Roy) नावाचा उल्लेख करावा लागेल. तिचे काही दिवसांपूर्वीच लग्न झाले. मात्र मौनीनं त्यानंतर बोल्ड़ फोटो शेयर करुन नेटकऱ्यांची नाराजी ओढावून घेतली आहे. यापूर्वी देखील तिनं जे फोटो सोशल मीडियावर व्हायरल (Entertainment News) केले होते त्या फोटोंवर नेटकऱ्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. मौनी ही सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी असून तिनं आतापर्यत मोठ्या प्रमाणावर आपला फॅन फॉलोअर्स तयार केला आहे. वेगवेगळ्या रियॅलिटी शो मध्येही तिनं चाहत्यांना आपल्या बोल्डनेसनं घायाळ करुन टाकलं आहे.

सध्या सोशल मीडियावर मौनीनं काही बोल्ड फोटो शेयर केले आहेत. त्यावरुन चाहत्यांनी तिचं कौतूक केलं आहे. तर काही नेटकऱ्यांनी तिच्यावर खालच्या शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. मौनी आता तुझं लग्न झालं आहे तेव्हा अशाप्रकारचे फोटो पोस्ट करणं कितपत बरोबर आहे अशा आशयाच्या या प्रतिक्रिया आहेत. काहींनी तिला काळजी घेण्यास सांगितलं आहे तर काहींनी आगीचे इमोजी टाकून तिच्या लूकनं घायाळ केल्याचे सांगितले आहे. मौनीच्या हॉट लूकला चाहत्यांचा नेहमीच प्रतिसाद मिळताना दिसतो. ती सध्याच्या घडीला टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील आघाडीची अभिनेत्री आहे.

27 जानेवारीला तिनं आपला बॉयफ्रेंड सुरज नांबियारसोबत लग्न केलं. ते दोघे गोव्यामध्ये विवाहबद्ध झाले होते. त्यांची पहिली भेट दुबईमध्ये झाली होती. त्यानंतर बराच काळ त्यांनी एकमेकांना डेट केले. त्या दोघांनी आपआपल्या रिती रिवाजाप्रमाणे लग्न केले. तिच्या डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यालाही नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. मौनीनं आतापर्यत वेगवेगळ्या लूकमध्ये फोटो व्हायरल केले असून त्याला चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: पुण्यात १० मे रोजी राज ठाकरेंची सभा; मोहोळ यांचा करणार प्रचार

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

Viral Video: 'बाबा वारले,आई सोडून गेली..' रोल विकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाची हिंमत पाहून भारावले आनंद महिंद्रा, केली मोठी घोषणा

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

SCROLL FOR NEXT