Big Boss 16 Esakal
मनोरंजन

Big Boss 16: शिव ठाकरे स्वत: बिग बॉस बाहेर जाणार?

सकाळ डिजिटल टीम

टिव्हि विश्वातील सर्वात लोकप्रिय शो म्हणजे बिग बॉस. या शोमध्ये कधी काय होइल सांगता येत नाही. कधी कुणात जोरदार वाद होइल तर कधी कुणाची जवळिक वाढेल हे काही सागंता येत नाही. त्यातच आताच्या एपिसोडमध्ये शिव ठाकरे यांनी शालिन भानोट यांच्यात जोरदार वाद झाला. हा वाद हाणामारीपर्यंत गेला.

आता बिग बॉस अर्चनाप्रमाणे शिव ठाकरेलाही घरा बाहेर काढणार असा प्रश्न गौहर खान हिने उपस्थीत केला आहे. खर तर वाद हा एमसी स्टॅन आणि शालिनमध्ये झाला मात्र यावादात दोघेही शीवीगाळ करु लागले. त्यानंतर शालिनने शिवी दिल्यामूळे शिवचा पारा चढतो आणि त्याच्यात आणि शालिनमध्ये हाणामारी होते. त्यातच शिव शालिनचा गळा पकडतो आणि त्याला मागे ढकलतो.

काही दिवसांपुर्वीही अर्चना गौतमने शिवचा गळा पकडला होता. त्यामूळे तिला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढल्यात आले होते. आज तोच प्रकार पुन्हा झाल्याने शालिनच्या विरोधात शिवने केलेल्या हिंसाचारावर गौहर खानने गुरुवारी रात्री उशिरा प्रतिक्रिया देत ट्विट केले, “शिवने अक्षरशः शालिनचा चेहरा पकडला आणि त्याला मागे ढकललं. मग शिवाने स्वतःला याशोच्या बाहेर का करू नये? दादागिरी! शालिननं काहीही चुकीचं केलेलं नाही, त्याला एमसी स्टॅनने विनाकारण शिवीगाळ केली. त्याची भाषा खूप वाईट आहे. तो संपूर्ण गटचं गुंडांनी भरलेला आहे!”

यानंतर, अनेक दर्शकांच्याही यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. ट्विटरवर विचारण्यात येत आहे की अर्चनाला जशी तिच्या कृत्याची शिक्षा देण्यात आली तशीच शिक्षा शिवला पण देण्यात येइल का? एका दर्शकाने ट्विट केले, “बिग बॉस उद्याच्या एपिसोडमध्ये भेदभाव होवू देऊ नका. शिव ने हात उचलला आहे. तुमच्याकडून अपेक्षा आहे की तुम्ही शिवलाही शिक्षा द्यालं

या एपिसोडनंतर अजून तरी बिग बॉसने त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. बिग बॉसने शिव आणि एमसी स्टॅनने शालिनला मारहाण करताना पाहिले नाही परंतु घरातील सदस्यांनी अर्चनाला शिवसोबत असचं केल्यामुळे तिला घरातून काढलं. असंही प्रेक्षंक बोलंत आहेत. त्यामूळे आता बिग बॉस काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule : मुख्यमंत्री फडणवीस केंद्रीय मंत्री तर बावनकुळे मुख्यमंत्री? स्वत: मंत्री बावनकुळेंनींच दिलं स्पष्टीकरण

NGO साठी सुवर्णसंधी! HCL Foundation देणार 24 कोटी रुपयांचे अनुदान; अर्ज प्रक्रिया सुरू, पाहा सविस्तर

Latest Marathi News Update: पालखी सोहळ्यात भाविकांचे लाखोंचे दागिने, मोबाईल चोरीस

Horoscope : उद्या बनतोय दुर्मिळ दशकीर्ती योग! 'या' 5 राशी होणार मालमाल; करिअर-व्यवसायात भरभराट, आरोग्याची मोठी समस्या होणार दूर

Mansoon Romance : दहावी, करिअर, गोंधळलेलं मन आणि ‘गारवा’ अल्बम...

SCROLL FOR NEXT