Tv Entertainment News Khatron ke Khiladi: रोहित शेट्टीचा खतरो के खिलाडी हा शो नेहमीच चर्चेत असतो. सध्या या रियॅलिटी शो चा 12 वा सीझन सुरु झाला आहे. त्यावरुन वेगळाच वाद समोर आला आहे. तो म्हणजे त्याच्या संभाव्य (Rohit shetty) विजेतेपदाचे नाव समोर आले आहे. त्यामुळे मालिकेच्या निर्मात्यांची पोलखोल करण्यात आली आहे. खतरो के खिलाडीमध्ये जे टॉपचे तीन स्पर्धक आहेत त्यांची निवड झाली आहे. त्यामुळे रुबीना दिलैक तुषार कालिया, मोहित मलिक, फैशल (Viral News) शेख, यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. मात्र असे असताना देखील तुषारचे नाव संभाव्य विजेता म्हणून समोर आले आहे. कलर्स चॅनेलवर या रियॅलिटी शोचे प्रक्षेपण सुरु आहे. त्याला मिळणारा प्रतिसादही मोठा आहे. ( Khatron ke Khiladi Viral News)
दोन जुलैपासून नव्या सीझनचे काही एपिसोड प्रसारित झाले आहेत. त्याची एकुण संख्या सहा एवढी आहे. त्यातून एरिका पॅकर्ड, अनेरी वजानी बाहेर गेल्या आहेत. वास्तविक तो एक रेकॉर्डेड एपिसोड आहे. 50 दिवसांचे शुटींग पूर्ण केल्यानंतर आता स्पर्धक पुन्हा परतले आहेत. त्याचे एपिसोड आता नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. शुटींग करुन स्पर्धक हे भारतात परत आले आहेत. यासगळ्यात कोण विजेता होणार असा प्रश्न समोर आल्यानंतर त्यावर नेटकऱ्यांकडून सिनेमॅटोग्राफर तुषार कालियाच्या नावावर सर्वाधिक पसंती असल्याचे दिसून आले आहे. मात्र त्यामागील खरं कारण काय याची चर्चा व्हायरल झाली आहे.
फॅनपेजवर वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. त्यात नेटकऱ्यांनी वेगवेगळे प्रश्नही उपस्थित केले आहे. टॉप 5 मध्ये आता रुबीना दिलैक, जन्नत जुबैर, मोहित मलिक, फैसल शेख, तुषार कालिया यांची नावं होती. दोन अभिनेत्री त्यातून बाहेर पडल्यानंतर तीन पुरुष स्पर्धक राहिले आहेत. मात्र त्यापैकी कोण विजेता होणार याविषयी चर्चेला उधाण आले आहे. त्यात अनेकांनी तुषार कालियाच विजेता होणार यावर ठामपणे प्रतिक्रिया दिल्या आहेत.
गेल्या सीझनमध्ये 2016 च्या शोमध्ये सिद्धार्थ शुक्लानं विजेतेपद मिळवलं होतं. त्याला टक्कर देण्यासाठी अनेक कलाकार होते. मात्र त्याला विजेता घोषित करण्यात आलं होतं. याचे कारण म्हणजे तो कलर्स वाहिनीवर सुरु असलेल्या त्या शो मधील सीझनशी पहिल्या एपिसोडपासून जोडला गेला होता. त्यानं 2012 ते 2015 दरम्यान बालिका वधूमध्ये काम केलं होतं. त्यानंतर इंडियाज गॉट टँलेटमध्येही तो चमकला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.