Samantha: 'एक चाकू तर...' नागा चैतन्यासोबतच्या घटस्फोटावर समंथाची जाहीर प्रतिक्रिया |Samantha Ruth Prabhu comment on ex-husband naga Chaitanya | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Samantha News

Samantha: 'एक चाकू तर...' नागा चैतन्यासोबतच्या घटस्फोटावर समंथाची जाहीर प्रतिक्रिया

Koffee With Karan 7: करण जोहरच्या कॉफी विथ करणचा सातवा सीझन भलताच वादग्रस्त होताना दिसत आहे. यात करणनं आतापर्यत ज्या ज्या सेलिब्रेटींना बोलावलं आहे त्यांनी धक्कादायक खुलासे करुन नेटकऱ्यांचे लक्ष (Bollywood Actor Akshay Kumar) वेधून घेतले आहे. टॉलीवूडची प्रख्यात अभिनेत्री समंथा आणि नागा चैतन्याचा काही महिन्यांपूर्वी घटस्फोट झाला. त्यांच्या चाहत्यांना या घटनेनं मोठा धक्का बसला होता. आता समंथानं करणच्या कार्यक्रमात केलेल्या खुलाशानंतर ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. समंथानं (Actress Samantha) पहिल्यांदाच जाहिर एखाद्या कार्यक्रमातून अशाप्रकारची प्रतिक्रिया दिली आहे.

करणच्या त्या कार्यक्रमात अक्षय कुमार आणि समंथा सहभागी झाली होती. (Samantha Naga Chaitanya News) यावेळी त्यांनी बरीच धमालही केली. करणनं समंथाला तिच्या घटस्फोटीत पती नागा चैतन्यावरुन प्रश्न विचारल्यानंतर समंथानं जे उत्तर दिलं त्यामुळे ती चर्चेत आली आहे. टॉलीवूडमध्ये एकेकाळची सर्वात प्रसिद्ध जोडी म्हणून समंथा - नागा चैतन्याचे नाव घेता येईल. त्यांच्यातील कौटूंबिक वाद वाढत गेला. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये नागा चैतन्यानं तर समंथा ही मला कधी माझं मत मांडूच देत नव्हती. तिचा हेकेखोरपणा वाढला होता. त्यामुळे मला ते नातं नकोसं झालं होतं. अशा प्रकारची प्रतिक्रिया दिली होती.

समंथानं करणच्या प्रश्नावर दिलेल्या उत्तरानं नेहमीप्रमाणे समंथाला ट्रोल व्हावे लागले आहे. आम्ही एकमेकांच्या संमतीनं घटस्फोट घेतला आहे. त्यामुळे आता त्यावर फारसं बोलणं उचित ठरणार नाही. आम्ही एकत्र पुन्हा येऊ असे वाटत नाही. मी त्याच्याबद्दल काहीही सांगितलं तरी नेटकरी मला बोलणार हे मला माहिती आहे. त्यांना नागा चैतन्याला दोष देणं आवडत नाही. याचा अर्थ त्याची काही चूकच नाही हे आपण गृहित धरुन चाललो आहोत. मला जेव्हा ट्रोल केले जाते तेव्हा मी काय करु शकते, अशावेळी लोकांना जे बोलायचे ते बोलू द्यावे.

मी कुणाविषयी तक्रार करत नाही. माझ्या चाहत्यांना काही गोष्टींविषयी स्पष्टीकरण हवे होते. ते मी त्यांना दिले आहे. मी आता पहिल्यापेक्षा जास्त खंबीर झाली आहे. आमच्यात काही वाद आहेत का असा प्रश्न जर विचारला तर यावर मी एक उत्तर देईल. ते म्हणजे आम्हाला एका खोलीत ठेवल्यात जवळ चाकू घेऊन झोपावे लागेल. त्यामुळे आता तरी आम्ही एकत्र येऊ अशी परिस्थिती नाही. भविष्याचे माहिती नाही.