indian idol rahul vaidya  Team esakal
मनोरंजन

राहुल स्टंट करायला गेला, जखमी झाला: फोटो व्हायरल

ज्यांना कुणाला इंडियन आयडॉलचा (indian idol) पहिला सीझन आठवत असेल त्यांना राहुल वैद्य (rahul vaidya) कोण हे नव्यानं सांगण्याची गरज नाही.

युगंधर ताजणे

मुंबई - ज्यांना कुणाला इंडियन आयडॉलचा (indian idol) पहिला सीझन आठवत असेल त्यांना राहुल वैद्य (rahul vaidya) कोण हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. काही महिन्यांपूर्वी त्याचं लग्न झालं. सोशल मीडियावर त्याच्या लग्नाची जोरदार चर्चा होती. बिग बॉसच्या (bigg boss) सीझनमध्ये त्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होत. त्यावेळी त्या स्पर्धेत सहभागी झालेल्या दिशा परमार नावाच्या स्पर्धकाबरोबर त्याचं नाव जोडलं गेल. त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णयही घेतला. त्या शो मध्येच व्हॅलेटाईंनच्या निमित्तानं त्यानं दिशाला प्रपोज केलं होतं. आता राहुल चर्चेत आला आहे ते एका वेगळ्या कारणासाठी.

rahul vaidya

राहुल सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारा सेलिब्रेटी आहे. त्याचे फॉलोअर्सही मोठ्या प्रमाणात आहे. तो आणि त्याची पत्नी दिशा (disha parmar) हे दोघेही वेगवेगळ्या पोस्ट शेयर करुन चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतात. राहुल हा आता खतरो के खिलाडीमध्ये सहभागी झाला आहे. धाडसी रियॅलिटी शो म्हणून त्या कार्यक्रमाकडे पाहिले जाते. त्याचा प्रेक्षकवर्गही मोठा आहे. त्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्यानंतर राहुलला एक स्टंट करण महागात पडलं आहे. त्यात तो जखमी झाला आहे. त्याचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. चाहत्यांनी त्याला आराम करण्याचा सल्लाही दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राहुल हा या शो च्या निमित्तानं चर्चेत आला आहे. खतरो के खिलाडीमध्य़े सहभागी झालेले स्पर्धक आपला बेस्ट परफॉर्मन्स देण्यासाठी आटोकाट प्रयत्न करताना दिसतात. कलर्स टीव्ही वाहिनीवर हा रियॅलिटी शो सुरु आहे. त्याला प्रेक्षकवर्गही मोठ्या प्रमाणात मिळताना दिसतो आहे. राहुलनं इंस्टाच्या माध्यमातून एक फोटो कोलाज शेयर केला आहे. त्यात दिसते आहे की, त्याच्या मानेला दुखापत झाली आहे.

राहुलचा सोशल मीडियावर फॅन बेस मोठा असल्यानं त्याच्या प्रत्येक पोस्टला मिळणारा प्रतिसादही तितकाच मोठा असतो. काही दिवसांपूर्वी त्याचं लग्न झालं. त्याचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले होते. चाहत्यांनी त्याच्या त्या फोटोंना लाईक्स, कमेंट दिल्या होत्या. त्याच्या भावी वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Silver Price Impact: चांदी ठरली गेमचेंजर! या उद्योगपतीची कोट्यवधींची कमाई; चांदीचे भाव वाढल्याने कंपनीचे शेअर्स रॉकेटसारखे झेपावले

रेखाने का केलेलं मुकेश अग्रवालशी लग्न? मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, 'तिच्या डोक्यात फक्त...

Ichalkaranji Election : महापालिका निवडणूक जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग; भाजप-मविआकडून इच्छुकांच्या मुलाखती सुरू

Latest Marathi News Live Update : महायुती करायची असेल तर राष्ट्रवादीला १५ टक्के जागा हव्यातच; अजित पवारांच्या नेत्याचा इशारा

RTO Action: ओला, उबेर, रॅपिडोवर आरटीओचा छापा; नियम भंगाची दंडात्मक कारवाई!

SCROLL FOR NEXT