Yashashree Masurkar
Big Boss 4:
Yashashree Masurkar Big Boss 4: Esakal
मनोरंजन

Big Boss 4: ‘बिग बॉस स्क्रिप्टेड’ यशश्रीने केला धक्कादायक खुलासा..!

सकाळ डिजिटल टीम

बिग बॉस मराठीचा यंदाचा सिजन चांगलाच गाजतोय. त्यातच या रविवारी बिग बॉसची चावडी चांगलीच रंगली. बिग बॉसने घेतलेल्या एका मोठ्या निर्णयामुळे सदस्यांना धक्का बसला. या आठवड्यात किरण माने, अमृता देशमुख, अमृता धोंगडे आणि तेजस्विनी लोणारी आणि यशश्री हे स्पर्धक हे घरातुन बाहेर जाण्याच्या मार्गावर होते. मात्र यातुन यशश्री मसुरकर हिला घराबाहेर जावं लागलं. शनिवारी जवळपास ४९ दिवसाच्या प्रवासानंतर यशश्रीला घराबाहेर पडली.

बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर तिने बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर यशश्रीने तिच्या सोशल मिडियावर तिच्या चाहत्यांसाठी एक खास पोस्ट शेअर केली. या पोस्टद्वारे तिने तिच्या चाहत्यांचे आभार मानले आहे.यात तिने तिने लिहिलं आहे,"तुमच्या सहकार्याबद्दल आभार... खूप खूप प्रेम". नूकतंच तिने सकाळ डिजिटला दिलेल्या मूलाखतीत या शोबद्दल अनेक खूलासे केले.

100 दिवस आणि 24 तास चालणारा हा खेळ स्क्रिप्टेड असेल कि नाही असा प्रश्न प्रत्येकालाच पडलेला असतो. हे सगळं पूर्व नियोजित आहे असेही बोलले जाते पण हे स्क्रिप्टेड आहे की नाही. (bigg boss marathi 4 Yashashree Masurkar said bigg boss marathi scripted or not) यावेळी तिला विचारण्यात आलं होतं की बिग बॉस स्क्रिप्टेड असतं का? यावर उत्तर देतांना ती म्हणाली,” नाही बिग बॉस स्क्रिप्टेड नाहीये... आपण कसं वागायचं? कसं बोलायचं? हे कोणी आपल्याला नाही सांगू शकतं जर स्क्रिप्टेड असंत तर किती सारे लेखक लागतील असं ही मस्करीत म्हणाली. “तुम्हाला वाटत तसं तुम्ही बोलता आणि वागतात. जर स्क्रिप्टेड असतं तर घरात खूप खेळीमेळीचं वातावरण घरात राहिलं असतं.. “ त्यामूळे बिग बॉस शो स्क्रिप्टेड नसतो असं तिनं स्पष्ट केलं..   

हेही वाचा: गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

याआधी महेश मांजरेकरांनीही या बद्दल सांगतांना म्हणाले होते की, “लोक मला येऊन विचारतात की हा शो स्क्रिप्टेड असतो का? त्यावर मी त्यांना सांगू इच्छितो की, एखादे नाटक करताना आम्ही महिनाभर सराव करतो. इथे २४ तास आणि १०० दिवस…. म्हणजे किती महिने सराव करावा लागेल. बरं मला कितीतरी स्पर्धकांनी सांगितलंय की आम्ही असं वागायचं, हे करायचं असे ठरवून जातो, पण ते होत नाही. त्याचं कारण म्हणजे ज्या काही घटना आत घडतात, त्यावर तिकडे प्रतिक्रिया उमटते. मी पूर्ण आठवडा तो शो पाहतो आणि त्यानंतर मला समजतं की कोणाची काय वाजवायची असते.''

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ghatkopar hoarding: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेला उदयपूरमधून अटक

PM Narendra Modi: पत्रकार परिषद का घेत नाही? पंतप्रधान मोदींनी स्पष्ट सांगितलं

Swati Maliwal: स्वाती मालिवाल प्रकरण तापणार; दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल

'जिरेटोप देणाऱ्याला डोकं नाही अन् घालून घेणाऱ्यालाही डोकं नाही'; उद्धव ठाकरेंचा भर पावसात हल्लाबोल

SRH vs GT : हैदराबाद - गुजरात सामना पाण्यात! काही न करता पॅट कमिन्सचा संघ पोहचला प्ले ऑफमध्ये

SCROLL FOR NEXT