Akshay Kumar Wishes Twinkle Khanna:
Akshay Kumar Wishes Twinkle Khanna:  Esakal
मनोरंजन

Twinkle Khanna Birthday: "काय विचार करून लग्न केलं अन् आता..", ट्विंकलच्या वाढदिवशीच अक्षय कुमार असं का म्हणाला?

Vaishali Patil

Akshay Kumar Wishes Twinkle Khanna: नव्वदच्या दशकातील अभिनेत्री आणि लेखिका ट्विंकल खन्ना आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. आज ती 50 वर्षाची झाली आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त सर्वच तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

ट्विंकलने देखील तिच्या इंस्टाग्राम हँडलवर पाण्यात पोहतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आणि तिच्या वाढदिवसानिमित्त 'जस्ट कीप स्विमिंग'चा सल्ला दिला आहे. वयाच्या 50 व्या वर्षी कुटुंबासोबत तिने सेलिब्रेशन केलं तर दुसरीकडे अक्षय कुमारने देखील पत्नीला हटके शुभेच्छा दिल्या आहेत.

ट्विंकल खन्नाच्या वाढदिवसानिमित्त अक्षयने एक व्हिडिओ शेअर करत तिला मजेशीर पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

या व्हिडिओत अक्षयने ट्विंकल खन्नाचे दोन लूक चाहत्यांसोबत शेअर केले. यात व्हिडिओच्या सुरुवातीला ट्विंकल पांढऱ्या ड्रेसमध्ये दिसते. तर पुढे ट्विंकल हल्कच्या पुतळ्यासमोर उभी राहून मोठ्याने ओरडते. यावर अक्षयने लिहिले आहे की, 'मला वाटलं मी कुणासोबत लग्न केलं? पण मी प्रत्यक्षात हिच्यासोबत लग्न केलं'. असं गमतीशीर कॅप्शन लिहिलंय

तर या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले, 'माझा हल्क दीर्घायुषी होवो!! तुझ्या विनोदाने आमच्या आयुष्यात इतकी वर्षे जोडल्याबद्दल धन्यवाद. देव तूला दिर्घायुषी करो. वाढदिवसाच्या शुभेच्छा, टीना.'

अक्षय आणि ट्विंकलच्या लग्नाला 23 वर्षे झाली आहेत. त्यांना 21 वर्षांचा मुलगा आणि 11 वर्षांची मुलगी आहे. ट्विंकल आणि अक्षय दोघेही आपल्या कुटुंबासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असतात.

अक्षय कुमारच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो शेवटचा 'मिशन रानीगंज'मध्ये दिसला होता. तो लवकरच 'वेलकम टू जंगर', 'बडे मियाँ छोटे मियाँ' आणि 'हेरा फेरी 3' या चित्रपटात दिसणार आहे.

तर ट्विंकलने बॉबी देओलसोबत 'बरसात' चित्रपटातून पदार्पण केले होते. तिचे 'दिल तेरा दिवाना', 'उफ्फ ये मोहब्बत', 'इतिहास' हे तिन्ही चित्रपट एकापाठोपाठ एक फ्लॉप गेले. त्यानंतर तिचे अनेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाल्याने ट्विंकल खन्नाने चित्रपट जगतापासून दूर राहण्याचे ठरवले. आता ती लेखिका आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT