Pandit Jasraj 
मनोरंजन

Pandit Jasraj: शास्त्रीय गायक पंडित जसराज यांच्या पोस्टल तिकीटांचे दिल्लीत प्रकाशन

पंडित जसराज यांच्या संगीत कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण होत असताना भारतीय टपाल विभागाने त्यांच्या स्मरणार्थ एक तिकीट जारी केले आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली.

Sandip Kapde

Pandit Jasraj: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीत  शास्त्रीय गायक पंडित जसराज यांच्या तिकीटांचे प्रकाशन केले. पंडित जसराज यांच्या संगीत कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण होत असताना भारतीय टपाल विभागाने त्यांच्या स्मरणार्थ एक तिकीट जारी केले आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित  शाह यांनी दिली. 

शास्त्रीय संगीत प्रत्येक घराघरात पोहोचवणारे शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचे वयाच्या 90 व्या वर्षी अमेरिकेत निधन झाले होते. पंडित जसराज आज भौतिकदृष्ट्या आपल्यात नसतील, पण त्यांचा आवाज आणि त्यांचे अस्तित्व कायम राहील.

भारतातच नाही तर जगभरात पंडित जसराज यांची ख्याती आहे. पुण्यातील सवई गंधर्व महोत्सवात देखील त्यांनी सादरीकरण केले होते.

पंडित जसराज हे भारतीय शास्त्रीय संगीत पद्धतीतील मेवाती घराण्याचे गायक होते. भारतीय केंद्रशासनाने संगीत क्षेत्रातील कामगिरीबद्दल २००० साली पद्मविभूषण पुरस्कार देऊन जसराज यांना गौरविले होते. (Latest Marathi News)

शास्त्रीय गायक पंडित जसराज यांनी एक अनोखी कामगिरी केली आहे.अंटार्क्टिकाच्या दक्षिण ध्रुवावर त्यांनी शास्त्रीय गायकाने सादरीकरण केले होते. यासह सातही खंडांमध्ये कार्यक्रम सादर करणारे ते पहिले भारतीय होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT