Upcoming-movie
Upcoming-movie 
मनोरंजन

रुपेरी पडद्यावर ऐतिहासिक घोडदौड!

संतोष भिंगार्डे

मुंबई - हिंदी-मराठीचा रुपेरी पडदा आता एका इतिहासासाठी सज्ज होत आहे. ‘हिरकणी’सारख्या ऐतिहासिक कलाकृतीपाठोपाठ तशाच आशयाचे पाच ते सहा चित्रपट आगामी काही महिन्यांमध्ये रुपेरी पडद्यावर येणार आहेत.

प्रसाद ओक दिग्दर्शित ‘हिरकणी’ चित्रपट यशस्वी वाटचाल करीत आहे. रसिकांची त्याला चांगली पसंती मिळाली. आता दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित मराठी ‘फत्तेशिकस्त’, इंग्रजी व मराठीतून बनलेला स्वाती भिसे निर्मित-दिग्दर्शित ‘द वॉरिअर क्वीन ऑफ झांशी’, आशुतोष गोवारीकर यांचा ‘पानिपत’ आणि ओम राऊतचा ‘तानाजी ः द अनसंग वॉरियर’ असे दोन हिंदी चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. एकूणच मराठी व हिंदीच्या रुपेरी पडद्यावर ऐतिहासिक चित्रपटांची रांगच लागणार आहे. आपला धगधगता आणि प्रेरणादायी इतिहास तरुण पिढीला पाहता येणार आहे. 

‘फत्तेशिकस्त’ ऐतिहासिक चित्रपट ‘शाहिस्तेखान बुर्जी’ डायरीवर बेतलेला आहे. मराठीतील बिग बजेट आणि मोठे कलाकार असलेला हा चित्रपट १५ नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. ‘द वॉरिअर क्वीन ऑफ झांशी’ याच महिन्यात अमेरिकेत प्रदर्शित होणार आहे. मराठी भाषेबरोबरच तो इंग्रजीतही आहे. त्याशिवाय हिंदीमध्येही दोन महत्त्वपूर्ण चित्रपट डिसेंबर-जानेवारीत प्रदर्शित होणार आहेत. ऐतिहासिक चित्रपट बनविण्यात हातखंडा असणाऱ्या आशुतोष गोवारीकर यांच्या भव्यदिव्य ‘पानिपत’ चित्रपटात अर्जुन कपूर, क्रिती सेनॉन, संजय दत्त आणि पद्मिनी कोल्हापुरे अशी मोठी स्टारकास्ट आहे. पानिपतची लढाई इतिहासातील एक सोनेरी पान आहे. तो इतिहास आताच्या पिढीला समजण्याच्या उद्देशाने गोवारीकर यांनी चित्रपट बनविला आहे. ओम राऊत शूर-पराक्रमी मावळा तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर बेतलेला ‘तानाजी’ चित्रपट आणत आहे. अजय देवगण त्यात तानाजींची भूमिका साकारत आहे. 

महाराष्ट्राला खूप मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. अनेक शूर वीर-पराक्रमी वीर या मातीत होऊन गेले. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई, जिजामाता आदी अनेक थोर व्यक्तींचा जीवनप्रवास प्रेरणादायी आहे. ऐतिहासिक चित्रपट येत आहेत ही चांगली बाब आहे. ही तर सुरुवात आहे. आणखी काही चित्रपटही येतील. 
- नितीन देसाई, कला दिग्दर्शक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chitra Wagh: ठाकरे गटाच्या जाहिरातीमध्ये पॉर्नस्टारचा वापर? चित्रा वाघ यांनी फोटो दाखवत केले गंभीर आरोप

Mahesh Manjrekar : स्वातंत्र्य वीर सावरकर, रणदीपचा हस्तक्षेप आणि मतभेद ; मांजरेकरांनी अखेर सोडलं मौन

Zimbabwe: झिम्बाब्वेने तयार केलं नवं चलन; पण सरकारी खात्यांमध्येच चालेनात नोटा, जनताही नाराज, काय आहे कारण?

T20 World Cup Team India : टी-20 वर्ल्ड कपचे शेर IPL मध्ये ढेर, संघात स्थान मिळताच 'हे' 6 भारतीय खेळाडू ठरलं फ्लॉप

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

SCROLL FOR NEXT