Urfi Javed shows off her bruises after wearing top made of chains sakal
मनोरंजन

उर्फीचा कहर.. कपड्यांऐवजी गुंडाळल्या लोखंडी साखळ्या आणि टाळे.. अखेर आली सूज

आपल्या कपड्यांवरुन कायम चर्चेत असलेली उर्फी चक्क साखळ्या गुंडाळून बसली आहे.

नीलेश अडसूळ

Urfi Javed wear top made of chains : टीव्ही मनोरंजन क्षेत्रामध्ये (Tv entertainment news) आपल्या हटक्या आणि बोल्ड अंदाजानं अभिनेत्री उर्फीनं मोठी लोकप्रियता मिळवली आहे. तिच्या वेगवेगळ्या लूकला चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स (Social media viral news) दिल्या आहेत. उर्फी सोशल मीडियावर झळकण्यासाठी काहीही करायला तयार असते. कधी अंगावर फुलं लावते तर कधी दोऱ्या गुंडाळते. सतत काहीतरी वेगळ्या पद्धतीचे कपडे परिधान करून ती फोटो आणि विडियो शेयर करत असते. आता तर तिने चक्क लोखंडी साखळ्या अंगाभोवती गुंडाळल्या आहेत. त्यावर टाळेही लावले आहे. पण या विचित्र फॅशनचे परिणामही तिला भोगावे लागले आहेत. (uorfi javed news sakal)

उर्फी ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी आहे. ती सतत काहीतरी वेगळा लुक घेऊन चाहत्यांसमोर येत असते. आता तर उर्फीने काहरच केला आहे. तिने अंगावर टॉपच्या ऐवजी थेट लोखंडी साखळ्या गुंडाळल्या आहेत. या साखळ्याभोवती छोटे छोटे टाळे देखील लावले आहेत. तर खाली काळ्या रंगाची जाळीदार पॅन्ट घातली आहे. तिचा हा लुक भलताच चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे चाहत्यांनी यावर भन्नाट कमेंट केल्या आहेत.

'उर्फी टू स्वतःच एक मोठा विनोद आहे' अशी प्रतिक्रिया चाहत्याने दिली आहे तर दुसरा म्हणतो, 'कुणाला घर लॉक करायला साखळ्या नसतील तर उर्फीकडे मागा.' उर्फी आशा विचित्र लूकने कायमच सगळ्यांच्या चर्चेचा भाग होत असते. पण आज तिच्या या विचित्र फॅशनचा तिला स्वतःलाच त्रास झाला आहे. लोखंडी साखळ्या घातल्याने त्याचा भार मानेवर पडून मानेला सूज आली आहे आणि जखम झाली आहे. त्याचेही फोटो उर्फीने शेयर केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT