Uorfi Javed Latest Video Esakal
मनोरंजन

Uorfi Javed Video: "शर्टात शर्ट गुलाबी शर्ट..", उर्फीची फॅशन पाहून नेटकरी थक्क! व्हिडिओ व्हायरल

Vaishali Patil

Uorfi Javed Latest Video: कधी लहान मुलांची खेळनी तर कधी बबलगम, कधी कंगवा तर कधी माशांपासून बनवलेला टॉप. ही सर्व फॅशन आहे उर्फी जावेदची. ती नेहमीच तिच्या असामान्य शैली चाहत्यांच्या चकित करत असते. तिची फॅशन ही कल्पनेपलीकडची आहे.

उर्फी जावेद ही दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रसिद्धीच्या झोतात येते. कधी तिची अतरंगी फॅशन तर कधी तिचे वक्तव्य. या दोन्हीमूळे तिच्यावर टीकीही केली जाते. मात्र या टीकेचा तिच्यावर काहीच फरक पडत नसल्याचं नेहमीच दिसतं.

उर्फी प्रत्येक वेळी अशी काहीतरी वेगळी फॅशन करते की ते पाहिल्यानंतर नेटकरी हैराण होतात. यावेळीही उर्फीने अशीच काहीशी फॅशन केली आहे. मात्र यावेळी तिने परिधान केलेल्या ड्रेसचं नेटकरी कौतुक करत आहेत.

उर्फी जावेद एक क्रिएटिव्ह ड्रेस परिधान केला आहे. यावेळी उर्फीने 7 कॉलर पिंक ड्रेस घातला आहे. ज्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

या ड्रेससोबतच तिने फ्रेंच स्टाइल हेअरस्टाइल केली आहे. ती मुंबईच्या रस्त्यांवर निघाली तेव्हा ती या लूकमध्ये स्पॉट झाली होती. उर्फी जावेदने हाय हिल्स, हेअर बन आणि न्यूड मेकअपसह तिचा लुक पूर्ण केला होता.

उर्फीच्या क्रिएटिव्हीचं लोक कौतुक करत आहे. तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी तिच्या या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे.

उर्फीचे असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ज्यात तिने तिची फॅशन दाखवलेली असते. काही दिवसांपुर्वी तिने पाण्याने भरलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या आणि अनेक माशांपासून बनवलेले ब्रॅलेट घातले आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट होताच सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यावेळी तिला अनेकांनी ट्रोल केले होते.

कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर उर्फी जावेदने 'ये रिश्ता क्या कहलाता है', 'कसौटी जिंदगी की 2' आणि 'बेपनाह' सारख्या लोकप्रिय शोमध्ये काम केले आहे. मात्र ती बिग बॉसने प्रसिद्धीच्या झोतात आली. आता ती काही रिअॅलिटी शो होस्ट करतांना दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Crime: प्रेमाच्या आड आलेला पती ठार! कोरपना तालुक्यात धक्कादायक हत्या

Dombivli Kalyan Politics:'डोंबिवली कल्याणचा राजकीय पट बदलतोय'; वैर संपतंय, हितगुज वाढतेय; नवी समीकरण जुळतायत..

Latest Marathi Breaking News: मुंबईत CNGचा तुटवडा, पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

अबोली फेम सचित पाटीलची निर्माता म्हणून नवी इनिंग ! असंभव सिनेमाबद्दल म्हणाला..

Mangalwedha Municipal Elections: 'मंगळवेढ्यात नगराध्यक्षपदासाठी 19 अर्ज तर नगरसेवकासाठी 160'; निवडणूक निर्णय अधिकारी मदन जाधव यांची माहिती

SCROLL FOR NEXT