Abhishek Bachchan & Aishwarya Rai-Bachchan
Abhishek Bachchan & Aishwarya Rai-Bachchan Google
मनोरंजन

Valentine Special Aishwarya : 'अभिषेक माझ्यापेक्षा लहान म्हणून तर...' ऐश्वर्यानं सांगून टाकलं!

सकाळ डिजिटल टीम

Aishwarya Rai And Abhishek Bachchan Life: बॉलीवूडमध्ये आपल्या सौंदर्यानं चाहत्यांना वेडावून टाकणाऱ्या ऐश्वर्याच्याबाबत नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या गॉसिप व्हायरल होत असतात. अभिषेक बच्चनशी लग्न करण्याअगोदर ऐश्वर्या ही अनेकांना डेट करत होती. त्यात सलमान खान, विवेक ऑबेरॉय, यांच्यासोबत तिचं नाव जोडलं गेलं होतं. अखेर बच्चन कुटूंबियांची ती सून झाली.

अभिषेक बच्चनसोबत अनेक चित्रपट केल्यानंतर त्यांचे डेटिंग सुरु झाले. त्यानंतर तिला अभिषेकबद्दल अधिक जाणून घेता आले. यासगळ्यात त्याच्यासोबत लग्न करण्याची ऐश्वर्यानं तयारी दर्शवली. अभिषेकनं जगातल्या सगळ्यात सुंदर मुलीला प्रपोझ करुन लग्नाविषयी मागणी घातली होती. पहिल्यांदा ऐश्वर्या त्या नात्याला वेगळा आकार देण्याबद्ल थोडी साशंक होती. मात्र तिनं तो निर्णय घेतला आणि त्यात ती यशस्वी झाली.

Also read - नेट बँकिंग सुविधा वापरताय? मग हे नक्कीच वाचा...

२००७ मध्ये ऐश्वर्या आणि अभिषेकचं लग्न झालं. २०१६ मध्ये झालेल्या एका मुलाखतीमध्ये ऐश्वर्यानं काही गोष्टींचा खुलासा केला होता. व्हॅलेंटाईनच्या निमित्तानं पुन्हा एकदा त्या गोष्टी व्हायरल झाल्या आहे. ऐश्वर्या अभिषेकविषयी काय विचार करते याबद्दल तिनं सांगितलं होतं. त्याची चर्चाही झाली होती. तिला मुलाखतकर्त्यानं एक प्रश्न विचारला होता तो म्हणजे, तुझ्यापेक्षा लहान अभिषेकवर तुला क्रश होते का...

ऐश्वर्यानं त्या प्रश्नाचं दिलेलं उत्तर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. आता माझे लग्न झाले आहे. खरं सांगायचं तर अभिषेक बच्चन हा माझ्यापेक्षा लहान आहे. त्यामुळे लहान असणाऱ्यांवर फार कमी वेळा क्रश होतं. तसंही माझं त्याच्यावर काही क्रश नव्हते. आमच्यात खूप चांगली मैत्री होती. लग्नानंतरही त्यात फार काही फरक पडलेला नाही. शाळेत किंवा कॉलेजमध्ये देखील माझं कुणी क्रश असे नव्हते.

मी जेव्हा बॉबी देओल सोबत और प्यार हो गया च्या शुटींगसाठी स्वित्झर्लंडमध्ये गेली होती. तेव्हा पहिल्यांदा तिकडे अभिषेकला पाहिले. अभिषेकचं क्रश होतं. हे त्यानं मला सांगितलं होतं. ढाई अक्षर प्रेम के मधून आम्ही पहिल्यांदा एकत्र आलो होतो. त्यानंतर आमच्यातील केमिस्ट्री वाढत गेली. ती अजुनही कायम आहे. असेही ऐश्वर्यानं यावेळी सांगितले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT