
Akshay Kumar : भारताच्या नकाशावर ठेवला पाय! खिलाडीच्या विरोधात थेट गृहमंत्रालयात तक्रार
Akshay Kumar Bollywood Actor Trolled : बॉलीवूडचा खिलाडी हा नेहमीच त्याच्या वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असतो. गेल्या काही महिन्यांपासून अक्षयच्या भोवती वाद निर्माण झाले आहेत. आताही तो भारताच्या नकाशावर चालल्याप्रकरणी त्याच्यावर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यानं समस्त भारतीयांच्या भावना दुखावल्याची प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली आहे.
गेलं वर्ष अक्षय कुमारसाठी काही फारसं चांगलं नव्हतं. त्याच्या सम्राट पृथ्वीराज, रामसेतू, बच्चन पांडे या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर म्हणावा असा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्याचा ओटीटीवर देखील एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. तो ही प्रेक्षकांनी नाकारला. त्यामुळे यंदाचे वर्ष त्याला मोठं यश देईल अशी त्याच्या चाहत्यांना आशा आहे. अशातच तो पुन्हा एका वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे दिसून आले आहे.
Also Read - नेट बँकिंग सुविधा वापरताय? मग हे नक्कीच वाचा...
अक्षय हा त्याच्या आगामी येणाऱ्या चित्रपटांचे प्रमोशन सोशल मीडियावर करताना दिसतो आहे.त्यातून त्याच्या हातून एक चूक घडली. ती म्हणजे तो चक्क भारताच्या नकाशावर चालत असल्याचे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि तो वादात सापडला. त्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. अक्षय हा सेल्फीच्या माध्यमातून त्याच्या चित्रपटांविषयी चाहत्यांना वेगळे काही आवाहन करताना दिसतो आहे. देशाच्या नकाशावर चालणं अक्कीला महागात पडले आहे. त्याच्या विरोधात एका वकिलानं थेट गृहमंत्रालयात धाव घेतली आहे.
त्या व्हिडिओमध्ये अक्षय कुमार हा एका इंटरनॅशनल एयरलाईन्सचा प्रचार करताना दिसतो आहे. ही जाहिरात करताना त्यानं भारताच्या नकाशावर पाय ठेवला आहे. ती जाहिरात पाहताच नेटकऱ्यांचा भडका उडाला आहे. त्यामुळे वकील विरेंद्र पंजाबी यांनी भावना दुखावल्याप्रकरणी संबंधित जिल्ह्याचे एसपी आणि गृहमंत्रालय यांच्याकडे तक्रार केली आहे.