Vanita Kharat Marathi Actress South Indian Look
Vanita Kharat Marathi Actress South Indian Look  esakal
मनोरंजन

Vanita Kharat : महाराष्ट्राच्या हास्यजत्रेतील वनिता आता 'टॉलीवूड' मध्ये दिसणार, दाक्षिणात्य अंदाज एकदा पाहाच!

युगंधर ताजणे

Vanita Kharat Marathi Actress South Indian Look : महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून आपली वेगळी निर्माण करणाऱ्या वनिता खरातचा चाहतावर्ग मोठा आहे. सोशल मीडियावर मोठी क्रेझ असणारी वनिता ही नेहमीच वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे. वनिता टॉलीवूडमध्ये झळकणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

वनितानं विविध चित्रपट आणि रियॅलिटी शो मधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. तिनं प्रसिद्ध शाहिद कपूर सोबत कबीर सिंगमध्ये केलेल्या भूमिकेचे देखील कौतुक झाले होते. आता वनिता दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये दिसणार असल्याचे बोलले जात आहे. मराठी सोबत हिंदी चित्रपट, मालिकांमध्ये वनिता चमकली आहे. तिच्या नवीन भूमिकेची नेहमीच चर्चा असते.

Also Read - Financial Planning: कसे सुधारायचे आपले आर्थिक आरोग्य....

वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिकांनी प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या वनिताचा ‘साऊथ इंडियन’ लूक नुकताच समोर आला आहे. नुकताच तिचा एक फोटो सोशल माध्यमावर शेअर करण्यात आला आहे. ती नेमकी कोणत्या चित्रपटात काम करणार आहे? हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला असता, 'एकदा येऊन तर बघा' असं म्हणत तिने रसिकांना थेट चित्रपटाचं आमंत्रण दिलं आहे.

येत्या २४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या प्रसाद खांडेकर दिग्दर्शित 'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटात वनिता दाक्षिणात्य अंदाजात दिसणार आहे. वेगळी भूमिका करण्याची संधी प्रत्येक कलाकार शोधत असतो. 'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटाच्या निमित्ताने ही संधी मला मिळाली असून माझं हे पात्र प्रेक्षक नक्कीच एन्जॉय करतील, असा विश्वास ती व्यक्त करते.

या चित्रपटात तिच्यासोबत गिरीश कुलकर्णी, सयाजी शिंदे, भाऊ कदम, तेजस्विनी पंडित, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, पॅडी कांबळे, ओंकार भोजने, विशाखा सुभेदार, राजेंद्र शिसातकर, शशिकांत केरकर, सुशील इनामदार, रोहित माने यांच्या भूमिका आहेत. लेखक-अभिनेता प्रसाद खांडेकर 'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शनात पदार्पण करीत आहे.

‘एकदा येऊन तर बघा' चित्रपटाची निर्मिती परितोष पेंटर, राजेशकुमार मोहंती, दिपक क्रिशन चौधरी, सेजल दिपक पेंटर यांची असून सहनिर्मिती अश्विन पद्मनाभन, सत्यनारायण मूरथी, डॉ.झारा खादर यांची आहे. चित्रपटाची कथा परितोष पेंटर यांची असून पटकथा, संवाद प्रसाद खांडेकर यांचे आहेत. गीते मंदार चोळकर यांची आहे.

रोहन-रोहन, कश्यप सोमपुरा यांचे संगीत चित्रपटाला लाभले आहे. छायांकन योगेश कोळी तर संकलन निलेश गावंड यांचे आहे. कार्यकारी निर्माते मनोज अवाना तर लाईन प्रोड्युसर मंगेश जगताप आहेत. हा चित्रपट २४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Mumbai News : महिला प्रवाशांची रेल्वेला साथ; सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होममुळे महिला डब्यात तुरळक गर्दी

OpenAI Robotics Comeback : लवकरच तुमच्या भेटीला येतोय 'AI रोबोट' ; प्रगत तंत्रज्ञान घेऊन OpenAIचं पुन्हा पदार्पण

SCROLL FOR NEXT