varun
varun 
मनोरंजन

वरुण धवनने दिला चक्क 'धर्मा प्रॉडक्शन'च्या दोन चित्रपटांना नकार

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई  ः धर्मा प्रॉडक्शनच्या स्टुडंट ऑफ द इअर या चित्रपटापासून वरुण धवनची हिंदी चित्रपटसृष्टीतील यशस्वी इनिंग सुरू झाली. या चित्रपटामुळे वरुण धवन, आलिया भट आणि सिद्धार्थ मल्होत्रा या कलाकारांना स्टारडम प्राप्त झाले. त्यानंतर वरुणने धर्मा प्रॉडक्शनच्या काही चित्रपटामध्ये काम केले. परंतु अलीकडे वरुणचे 'स्ट्रीट डान्सर 3डी' आणि 'कलंक' हे महत्त्वाकांक्षी चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करू शकले नाहीत. 

त्यामुळे वरुण आता खूप काळजीपूर्वक चित्रपट स्वीकारत आहे. आता त्याचा कुली नंबर 1 हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. त्याचे वडील डेव्हिड धवन यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर आणि चित्रपटगृहे सुरू झाल्यानंतर हा चित्रपट प्रदर्शित होईल. मात्र सध्या वरुण कोणत्या चित्रपटाचे चित्रीकरण करणार किंवा कोणता चित्रपट स्वीकारणार याबाबत सगळ्यांना उत्सुकता होती. 

मात्र आता वरुणने चक्क करण जोहरचे अर्थात धर्मा प्राॅडक्शनचे दोन चित्रपट नाकारले आहेत. त्यापैकी एक आहे 'मि. लेले' आणि दुसरा आहे 'रणभूमी'. 'मि. लेले'ची स्क्रीप्ट वरुणला पसंत पडली नाही. त्यामुळे त्याने या चित्रपटाला नकार दिला आहे आणि 'रणभूमी'मध्ये त्याला काही मजेशीर आहे, असे वाटले नाही. खरंतर या दोन्ही चित्रपटांचा दिग्दर्शक शशांक खेतान होता आणि त्याने व वरुणने 'हम्टी शर्मा की दुल्हनियां' आणि 'बद्रिनाथ की दुल्हनिया' असे दोन चित्रपट यशस्वी दिले आहेत. त्या दोघांची केमिस्ट्री चांगली जुळलेली आहे; मात्र तरीही वरुणने या चित्रपटाला नकार द्यावा याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शिवाय आता वरुणला कॉमेडीचा ओव्हरडोस असलेल्या भूमिका करायच्या नाहीत. कदाचित त्यामुळे त्याने करण जोहरला नकार दिला असावा, असे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', चेन्नईच्या थालावर भडकला मुंबईचा माजी कर्णधार

Latest Marathi News Update : झारखंडमध्ये ईडीचे छापे, मंत्र्याच्या कर्मचाऱ्याकडून करोडोंची रोकड जप्त

Bajrang Punia : नाडाकडून बजरंग पुनिया निलंबित नमुना; चाचणीला नकार,कुस्ती संघटना ‘वाडा’शी संपर्क साधणार

Aerobic Exercise : वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी करा ‘हे’ एरोबिक व्यायाम प्रकार, मानसिक अन् शारिरीक आरोग्य राहील तंदूरूस्त

Pune News : क्रिकेटच्या चेंडूने घेतला होतकरू खेळाडूचा बळी! अवघड जागी चेंडू लागल्यामुळे ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यु

SCROLL FOR NEXT