Varun Dhawan married Natasha Dalal last year. Instagram
मनोरंजन

आनंदाचे क्षण! हळदी समारंभात रंगपंचमी खेळला होता वरुण धवन,पहा फोटो

लग्नाच्या पहिल्या वाढदिवसा निमित्तानं अभिनेत्याला अनेक सेलिब्रिटींनी शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रणाली मोरे

वरुण धवन(Varun Dhawan) गेल्या वर्षी आपली गर्लफ्रेंड नताशा दलाल सोबत लग्नबंधनात अडकला होता. लग्नाआधी अनेक वर्षांपासून नताशा आणि वरुण नात्यात होते. सिनेइंडस्ट्रीत आल्यावर अनेक सुंदर-सुंदर अभिनेत्री आपल्या आजुबाजूला असतानाही नताशाला दिलेलं वचन मात्र वरुणनं पाळलं. नताशा हिचा बॉलीवूडशी थेट संबंध नसला तरी फॅशन इंडस्ट्रीतली ती आघाडीची फॅशन डिझायनर असल्या कारणाने तिचा कोणत्या नं कोणत्या कारणानं सेलिब्रिटींशी संबंध येतोच. पण तरिही नताशानं बॉलीवूडच नाही तर सोशल मीडियावरील गॉसिप्सपासूनही स्वतःला व्यवस्थित लांब ठेवलं आहे. वरुणनं लग्नाला एक वर्ष झाल्याच्या निमित्तानं सोशल मीडिया अकाऊंटवर हळदीचे सोबत लग्नाचेही काही Unseen Pics शेअर केले आहेत.

त्याच्या हळदीमध्ये तर त्यानं जीवाचं नाव शिवा ठेवून धम्माल केलेली दिसत आहे. त्यानं मित्रांसोबत हळद नव्हे रंगपंचमीचा आनंदच घेतलेला दिसत आहे. आज पहिल्यांदाच एक वर्षाने वरुणनं ते हळदीचे फोटो शेअर केले आहेत. तसचं,नताशासोबतचेही काही सुंदर फोटो त्याने लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शेअर केले आहेत. यामध्ये नताशा आणि वरुण ज्यापद्धतीनं विधींना सुरुवात होण्याआधी एकमेकांना हात जोडून नमस्कार करीत आहेत तो फोटो तर पाहण्याजोगा.

मोठं सेलिब्रिटी कुटुंब असतानाही लग्न अलिबाग सारख्या छोट्या ठिकाणी केल्याचं शल्य त्याच्या मनात मुळीच नाही. उलट तो म्हणतो,''माझ्या आयुष्यात जरी तो आनंदाचा क्षण होता तरी आजुबाजूला चाललेल्या विदारकतेचं ज्ञान मला होतं. कोरोनाने जी परिस्थिती करून ठेवलेली याची जाण मला होती. या कोरोनामुळे गेल्यावर्षी माझ्या कुटुंबातील प्रियजनांना मी गमावलं होतं,मी स्वतः कोरोनाबाधित झालो होतो. त्यामुळे मला मोठा तामझाम करीत असं कोणतंही काम करायचं नव्हतं ज्यामुळे माझ्या कुटुंबावर आणि आमच्या समारंभामुळे इतरांसाठी काही अडचण निर्माण होईल''. आज लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं लग्नाची काही खास क्षणचित्र चाहत्यांसोबत शेअर करत त्यानं आपल्या बायकोलाही हार्ट इमोजी पोस्ट करीत शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 3rd Test: रिषभ पंत आर्चरचा लॉर्ड्सवर सामना करण्याबद्दल म्हणाला, 'तो परत येण्याचा मला...'

Video: मी इथेच आहे, तुझ्यासोबत! पत्नी आयसीयूमध्ये, पतीने हात धरला अन्...; वृद्ध जोडप्याचा व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

Viral Video: कसाबसा जीव वाचला! रस्त्याची पाहाणी करायला आलेल्या अभियंत्यासमोरच कोसळला ट्रक, जीव वाचवण्यासाठी लोकांची पळापळ

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

SCROLL FOR NEXT