veteran Actor and DMDK founder Captain Vijayakanth aka Vijayakant passes away in Chennai  SAKAL
मनोरंजन

Captain Vijayakanth: ज्येष्ठ अभिनेते आणि DMDK संस्थापक विजयकांत यांचं निधन

विजयकांत यांच्या निधनाने मनोरंजन आणि राजकीय क्षेत्रातील व्यक्तींचं निधन झालंय

Devendra Jadhav

Captain Vijayakanth Passed Away: अभिनेता आणि देसिया मुरपोक्कू द्रविड कळघम (DMDK) चे प्रमुख कॅप्टन विजयकांत (वय 71) यांनी गुरुवारी चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. विजयकांत यांची कोविड -19 ची टेस्ट पॉझिटिव्ह झाली. त्यानंतर ते व्हेंटिलेटरी सपोर्टवर होते. पण आज त्यांची प्राणज्योत मालवली.

Miot हॉस्पिटलने अधिकृत निवेदनात नमूद केले आहे की, "कॅप्टन विजयकांत यांना न्यूमोनियासाठी दाखल केल्यानंतर ते व्हेंटिलेटरी सपोर्टवर होते. वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या अथक प्रयत्नांनंतरही, 28 डिसेंबर 2023 रोजी सकाळी त्यांचे निधन झाले."

विजयकांत तामिळनाडूमधील राजकारण आणि मनोरंजन उद्योगातील एक प्रतिष्ठित आणि आदरणीय व्यक्तीमत्त. त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांनी राजकीय - मनोरंजन क्षेत्रात समृद्ध वारसा मागे सोडलाय.

विजयकांत यांच्या निधनाने त्यांचे समर्थक आणि तामिळनाडूची जनता शोकसागरात बुडाले आहेत.

विजयकांत यांनी राजकारण आणि चित्रपट या दोन्ही क्षेत्रांमध्ये यशस्वी कारकीर्द मागे सोडलीय. त्यांनी 154 सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

याशिवाय त्यांनी DMDK च्या माध्यमातून विधानसभेचे सदस्य म्हणून दोन टर्म भूषवल्या. ऋषिवंदियम आणि विरुधाचलम जिल्ह्यांचे त्यांनी प्रतिनिधित्व केले. 2011 ते 2016 या काळात त्यांची तामिळनाडू विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती झाली.

27 डिसेंबरला त्यांची तब्येत थोडीशी खालावली होती. आणि आज त्यांचा आजारपणात मृत्यू झाला. एका लाडक्या नेत्याच्या निधनामुळे तामिळनाडूतील जनतेने शोक व्यक्त केलाय.

राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रातील उमदं व्यक्तिमत्व गमावल्याची भावना सर्वांच्या मनात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Pakistan Tensions : ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर आता भारताचा पाकिस्तानला आणखी एक दणका!

Midday Meal Egg Controversy : मध्यान्ह भोजनात अंडे देण्यावरून वाद...एकाच वेळी ७० पालकांनी मुलांना शाळेतून काढलं

VIRAL VIDEO: ए काय करतोयस? सेल्फी घेणाऱ्याला जया बच्चन यांनी दिला जोराचा धक्का; सगळेच अवाक, नेटकरी म्हणतात- त्याला...

Latest Maharashtra News Updates Live: केंद्र सरकारचा मोठा निर्णय, ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी

मृत्यूच्या दाढेतून परत आलेली सचिन यांची एकुलती एक लेक; "डॉक्टरांनी ती टेस्ट सांगितल्यावर मी हादरलो.."

SCROLL FOR NEXT