rashid irani  
मनोरंजन

प्रख्यात चित्रपट समीक्षक राशिद इराणी यांचं निधन

बॉलीवूडमध्ये(bollywood) चित्रपट समीक्षक (movie critics) म्हणून आदरानं घेतलं जाणारं नाव म्हणजे राशिद इराणी (rashid irani) यांचे निधन झाले आहे.

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडमध्ये(bollywood) चित्रपट समीक्षक (movie critics) म्हणून आदरानं घेतलं जाणारं नाव म्हणजे राशिद इराणी (rashid irani) यांचे निधन झाले आहे. ते 74 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर एका रुग्णालयामध्ये उपचारही सुरु होते. मात्र त्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे जवळचे मित्र रफीक इलियास यांनी याबाबत माहिती दिली. रफीक म्हणाले, त्यांचे जाणे हे अतिशय वेदनादायी आहे. एक अभ्यासू, जाणकार मित्र त्यांच्या निमित्तानं आम्ही गमावला आहे.

वास्तविक काही दिवसांपूर्वीच राशिद यांचा मृत्यु झाल्याची बातमी सुत्रांनी दिली होती. त्यानुसार ते अंघोळीला गेले असताना बाथरुममध्ये पाय घसरुन पडले होते. त्यातच त्यांचा मृत्यु झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. रफीक यांनी सांगितले की, आम्हाला सुरुवातीला वाटले की, ते काही कामानिमित्तानं बाहेर गेले आहेत. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र त्यांच्याशी काहीच संपर्क होत नसल्यानं चिंता वाटली. आम्ही पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घराचा दरवाजा तोडला. आणि त्यानंतर खरा प्रकार समोर आला. गेल्या वर्षी राशिद यांना कोरोना झाला होता. तेव्हापासून त्यांची तब्येत ठीक नव्हती.

मुंबई प्रेस क्लबनं देखील ट्विट् करुन राशिद इरानी यांच्या निधनाची बातमी दिली आहे. त्यात म्हटलं आहे की, देशातील आघाडीच्या समीक्षकांमध्ये राशिद यांचे नाव घ्यावे लागेल. 30 जुलैला त्यांचे निधन झाले. मात्र दोन ते तीन दिवस त्याविषयी कुणालाही माहिती नव्हती. ते मुंबई प्रेस क्लबचे एक प्रमुख सदस्यही होते. आपल्या समीक्षेनं त्यांनी जाणकार वाचकांची पसंती मिळवली होती. चित्रपट वर्तुळातही ते त्यांच्या लिखाणामुळे प्रसिद्ध होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : ''सर्व किल्ल्यांवरील अनधिकृत बांधकामं तात्काळ पाडून टाका''; 'युनेस्को'च्या घोषणेनंतर राज ठाकरेंची मागणी

Viral Video : कलाकार असावा तर असा ! भेटीसाठी आलेल्या आजींना संकर्षणने स्वतःच्या गाडीने सोडलं

Air India Plane Crash : तू इंधन का बंद केले? विमान कोसळण्यापूर्वी दोन्ही पायलटमधील संवाद समोर....

Latest Marathi News Updates : "पुढील चौकशीच्या आधारे, जबाबदार आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल."- प्रतापराव जाधव

Video : कुटुंब गाढ झोपलेलं अन् अचानक समोर फणा काढलेला किंग कोब्रा; बेडरूममध्ये पुढे जे झालं...,थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT