Veteran Singer Vaishali Shinde Passed Away at the age of 62 SAKAL
मनोरंजन

Vaishali Shinde: आंबेडकरी चळवळीचा बुलंद आवाज हरपला! गायिका वैशाली शिंदे यांचं निधन

आंबेडकरी चळवळीमध्ये सक्रीय असलेल्या दिग्गज गायिका वैशाली शिंदे यांचं दुःखद निधन झालंय

Devendra Jadhav

Vaishali Shinde Passed Away: आंबेडकरी चळवळीचा बुलंद हरपला. आंबेडकरी चळवळीत सक्रीय असणाऱ्या महाराष्ट्राच्या ख्यातनाम गायिका वैशाली शिंदे यांचे काल दि. 19/10/23 रोजी सांय 7 वाजता केईम हॉस्पीटल मुंबई येथे दुःखद निधन झाल्याची बातमी समोर आलीय.

वैशाली शिंदे या ६२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा आहे. घाटकोपर येथील भटवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

वैशाली या गेले अनेक महिने मधुमेहाने ग्रस्त होत्या. त्यातच त्यांच्या पायाला गॅंगरीन झाले होते. केईएम हॉस्पीटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. (Latest Marathi News)

वैशाली शिंदे यांना आई - वडिलांकडून गायनाचा वारसा मिळाला. त्यांचे आई - वडिल भीमगीतं गात असत. त्यामुळे लहानपणापासूनच भीमगीतांचं महत्व आणि शिकवण वैशाली यांना मिळाली. पुढे त्या आई - वडिलांसोबत पुण्यात स्थायिक झाल्या. विष्णू शिंदे यांच्याशी विवाह करुन त्या पुढे मुंबईत आल्या.

आई - वडिलांकडून मिळालेली शिकवण घेऊन भीमगीतं गाऊन वैशाली शिंदे यांनी आंबेडकरी चळवळीला आवाज दिलाय. त्यांच्या बुलंद आवाजातुन त्यांनी आंबेडकरी चळवळीला ऊर्जा देत आपल्या गायनातून समाज प्रबोधन केले.

वैशाली शिंदे यांच्या निधनाने विविध स्तरांमधून मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT