मनोरंजन

मोदीजी, अमेरिकेहून येताना माझ्यासाठी... राखीची अजब मागणी

बॉलीवूडची अभिनेत्री राखी (bollywood actress rakhi sawant) ही तिच्या हटकेपणासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे ती नेहमी चर्चेत असते.

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडची अभिनेत्री राखी (bollywood actress rakhi sawant) ही तिच्या हटकेपणासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे ती नेहमी चर्चेत असते. आताही तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. त्यामध्ये तिनं पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे (prime minister narendra modi) अमेरिकेवरुन येताना आपल्यासाठी एक वस्तू घेऊन यावी. असं सांगितलं आहे. मोदीजी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहे. राखीच्या त्या व्हिडिओला तिच्या नेहमीच्या व्हि़डिओप्रमाणं मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला आहे. तिला चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सही दिल्या आहेत. गेल्या बिग बॉसच्या पर्वामध्ये अंतिम स्पर्धकांमध्ये राखीचा समावेश होता. बिग बॉसचे ते पर्व राखीनं गाजवले होते. तिनं त्या शो च्या माध्यमातून मोठी लोकप्रियता मिळवली होती.

बॉलीवूडमध्ये राखी अशा सेलिब्रेटींपैकी एक आहे जी नेहमी आपल्या वेगळेपणामुळे चर्चेत असते. ती वादग्रस्तही आहे. ती इतर सेलिब्रेटींवर कसलाही विचार न करता काँमेट करत असते. त्या वक्तव्यामुळे तिला अनेकदा ट्रोलही व्हावे लागले आहे. मात्र त्याचा राखीवर काही एक परिणाम होत नाही. ती आपल्या व्हिडिओमधून चाहत्यांचे मनोरंजन करते. त्यातून कोणत्याही सेलिब्रेटीवर, राजकीय नेत्यावर टीका करते. आणि लोकप्रियता मिळवत असल्याचेही दिसून आले आहे. आता तिनं चक्क मोदींकडे अमेरिकेहून एक वस्तू आणण्याची मागणी केली आहे. त्यामुळे तिनं सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

राखी नेहमी जीमच्या बाहेर स्पॉट केली जाते. यावेळी तिला काही फोटोग्राफर्सनं प्रश्न विचारले. मोदीजी वॉशिंग्टनला आहेत. त्यावर तिनं त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की, मोदीजी आपल्या देशाच्या विकासासाठी अमेरिकेत गेले आहेत. अशावेळी मी त्यांना नमस्कार करते. आपण अमेरिकेत गेला आहात. तिथे असणाऱ्या आपल्या सर्व भारतीयांना आपण प्रेम द्या. त्यांना माझ्या खुशालीविषयीही सांगा. एवढ्यावरच राखी थांबलेली नाही. यावेळी राखीनं मोदींना आपल्यासाठी शॉपिंग करण्यासाठी विनंती केली आहे. तुम्ही ज्यावेळी अमेरिकेतून भारतात याल तेव्हा माझ्यासाठी डॉलर्स घेऊन या. अशी मागणी तिनं केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता प्रादेशिक सैन्यातही महिलांना संधी मिळणार, भारतीय लष्कराचा प्रायोगिक तत्वावर विचार

Dombivli Politics: टिळकनगरमध्ये मतदारांचा वेगळा कौल; 'स्थानिकच नगरसेवक हवा, उपरा नकोच'!

Latest Marathi Breaking News : अहिल्यानगर मधील खारेकर्जुन येथे बिबट्या वन विभागाच्या पिंजऱ्यात अडकला

Stock Market Today : शेअर बाजाची हिरव्या रंगात सुरुवात; सेन्सेक्स 240 अंकांनी वाढला; तर निफ्टी बँकने उच्चांक गाठला!

Truck Catches Fire: 'ट्रकला आग लागून २९ गायी भस्मसात'; नागपुरातील कत्तलखान्यासाठी गायींची बेकायदा वाहतूक, नेमकं काय घडलं..

SCROLL FOR NEXT