Shabana Azmi, Anushka Dandekar, Amruta Arora spotted for Farhan-Shibani Haldi Ceremony Google
मनोरंजन

Video: फरहान-शिबानीला हळद लागली,पहा सोहळा असा रंगला...

१९ फेब्रुवारीला खंडाळा इथे हे दोघे महाराष्ट्रीयन परंपरेनं लग्नगाठ बांधणार आहेत.

प्रणाली मोरे

फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि शिबानी दांडेकर(Shibani Dandekar) अखेर तीन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्नबंधनात अडकणार आहेत. २१ तारखेला बॉलवूडमधील काही निमंत्रित अनं जवळच्या मित्रपरिवाराच्या उपस्थितीत या दोघांचे रीसेप्शन पार पडणार आहे, तर त्याआधी १९ फेब्रुवारीला फरहानच्या खंडाळा येथील फार्महाऊसवर महाराष्ट्रीयन पद्धतीतं हे दोघे लग्नगाठ बांधणार असल्याचं बोललं जात आहे. पण लग्नाआधीच्या हळद आणि मेहेंदी सोहळ्याला मात्र सुरुवात झाली आहे. अनेक सेलिब्रिटींनी या सोहळ्याला उपस्थिती लावल्याचे काही फोटो-व्हिडीओ समोर आले आहेत.

यावेळी शिबानीची मोठी बहिण अनुष्का दांडेकर,रिया चक्रवर्ती,अमृता अरोरा यांनी हळदी समारंभाला उपस्थिती दर्शवली. या हळदी समारंभाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरेंदर चावलानं त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर तो शेअर केला आहे. या व्हिडीओत फरहानची उपस्थिती लक्षणीय होती,अर्थात नवरदेव जो ठरला तो. पॉप्युलर व्हि.जे आणि शिबानीची मोठी बहिण अनुष्का दांडेकर,अमृता अरोरा,रिया चक्रवर्ती यावेळी त्यांच्या गाडीतून उतरताना स्पॉट केले गेले.

कोरोनातून बऱ्या झाल्यानंतर शबाना आझमी ज्या फरहानच्या सावत्र आईदेखील आहेत त्यांनीही उपस्थिती दर्शवली होती.जावेद अख्तर यांनी काही दिवसांपूर्वीच फरहान-शिबानीच्या लग्नाची बातमी मीडियाला दिली होती. त्याचबरोबर हे लग्न त्यांच्या खंडाळा येथील फार्महाऊसवर खूप खाजगी आणि मोजक्या खास लोकांच्या उपस्थितीत होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.

फरहानच्या कामाविषयी म्हणायचं झालं तर तो पुन्हा एकदा दिग्दर्शक म्हणून आपल्याला 'जी ले जरा' सिनेमाचं दिग्दर्शन करताना दिसणार आहे. त्यानं या सिनेमासाठी लेखकाची जबाबदारीही आपली बहिण झोया अख्तर आणि रीमा कागटीसोबत उचलली आहे. या सिनेमात प्रियंका चोप्रा,कतरिना कैफ,आणि आलिया भट मुख्य भुमिकेत दिसणार आहेत. या सिनेमाच्या चित्रिकरणाला या वर्षातच सुरुवात केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

Latest Maharashtra News Updates : शित्तूर -आरळा व चरण -सोंडोली पुलावर सुरक्षिततेसाठी कोकरूड पोलिसांनी लावले बॅरिकेट

Trapit Bansal: भारतीय तरुणाचा जगभरात डंका! IITian त्रपित बंसलला Meta कडून अब्जावधींची ऑफर; सॅलरी ऐकून व्हाल थक्क

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

SCROLL FOR NEXT