Vidya Balan Playing Human Computer Shakuntla Devi In Biopic
Vidya Balan Playing Human Computer Shakuntla Devi In Biopic  
मनोरंजन

'मानवी कंप्युटर'च्या भूमिकेत विद्या बालन

सकाळवृत्तसेवा

मुंबई : प्रसिद्ध गणितज्ञ आणि 'मानवी कंप्युटर' म्हणून ओळख असेलल्या शकुंतला देवी यांच्या आयुष्यावर चित्रपट बनणार आहे. या बायोपिकमध्ये बॉलिवूडची अभ्यासपूर्ण भूमिका साकारणारी नायिका विद्या बालन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

शकुंतला देवी यांच्या बायोपिकमध्ये विद्या त्यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे. 'डर्टी पिक्चर', 'हमारी अधुरी कहानी', 'तुम्हारी सुलू', 'बेगमजान' या चित्रपटातील प्रत्येक भूमिकेला तितक्याच प्रभावीपणे रुपेरी पडद्यावर उतरवणारी विद्या नेहमीच तिच्या अभिनयाच्या माध्यमातून अनेकांना आश्चर्यचकीत करत गेली आहे. अनु मेनन या बायोपिकचे दिग्दर्शन करणार असून विक्रम मल्होत्रांची निर्मिती असलेला हा बायोपिक 2020 च्या उन्हाळ्यात प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं जातंय. विद्या बालनने ट्विटवरून आपण शकुंतला देवींची प्रमुख भूमिका साकारत असल्याचं सांगितलंय. 

शकुंतला देवींचा अल्पपरिचय : 
शकुंतला देवींचा जन्म 1929 मध्ये बंगळूरू मध्ये झाला. लहानपणीच त्यांच्या वडिलांना त्यांच्या अफाट बुद्धिमत्तेची प्रचिती आली. शकुंतला देवींनी गणिताबरोबर ज्योतिषशास्त्रावर सुद्धा अनेक पुस्तकं लिहिली आहेत. 1982 साली गिनीज बुक ऑफ रेकॅार्डने त्यांच्या कामाची दखल घेतली.

'गणितज्ञ शकुंतला देवींची भूमिका मोठ्या पडद्यावर साकारण्यास मी अतिशय उत्सुक आहे. मी आणि विक्रमने याआधी ‘कहानी’साठी एकत्र काम केलं आहे. शकुंतला देवींचा जीवनप्रवास प्रेरणादायी आहे. छोट्याशा गावातून आलेल्या या भारतीय मुलीची गोष्ट चित्रपटातून दाखवणं आनंदाची बाब आहे,' असं विद्या बालनने सांगितलं.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: भारतीय सैन्याकडे पाहून साताऱ्यातील लष्करी कुटुंबे आनंदी : PM Modi

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT