Virat Anushka and Priyanka Chopra and Nick Jonas celebrates Karwachauth
Virat Anushka and Priyanka Chopra and Nick Jonas celebrates Karwachauth 
मनोरंजन

विरूष्का, प्रियांका-निकने अशी केली करवाचौथ साजरी! फोटो बघाच...

वृत्तसंस्था

सौभाग्यवतींनी सगळीकडेच काल करवाचौथ धामधूमीत साजरी केली. सेलिब्रेटीही यात कमी नाही पडले. बॉलिवूडमधील काही जोडप्यांची ही पहिली करवाचौथ होती, तर काहीजणी दरवर्षी आपली करवाचौथ त्याच उत्साहाने साजरी करतात. वैवाहिक स्त्रियांसाठी स्पेशल असलेल्या या करवाचौथचे फोटो या सेलिब्रेटिंनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात विरूष्का, प्रियांका-निक यांच्या करवाचौथचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी काल करवाचौथ साजरी केली. यात अनुष्काने सुंदर लाल साडी परिधान केलीय. कुंकू, सिंदूर लावलंय. तर विराटने काळा कूर्ता घातला आहे. दोघांनीही चंद्रासोबत फोटो काढला आहे. अनुष्काने या फोटोला कॅप्शन दिलंय की,  'आयुष्यभरासाठी व त्यापुढेही माझा साथीदार, तसंच आज माझ्यासोबत उपवासही करणाऱ्या विराटला करवाचौथच्या शुभेच्छा...' या फोटोत दोघंही अत्यंत सुंदर दिसत आहेत. विराटनेही हा फोटो आपल्या अकाऊंटवर शेअर केलाय. 

तर देसी गर्ल प्रियांका यावर्षी आपली पहिली करवाचौथ साजरी केली आहे. प्रियांका आणि निक दोघांनीही करवाचौथचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. करवाचौथ दिवशी निक जोनासची लाईव्ह कॉन्सर्ट होती, तरीही दोघांनी वेळात वेळ काढून करवाचौथ साजरी केली. निकने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्या दोघांचे फोटो शेअर करत लिहिले आहे की, 'माझी पत्नी हिंदू आहे. ती मला तिच्या वेगवेगळ्या संस्कृती आणि पद्धती शिकवत असते. मला तिच्या सर्व गोष्टींचा आदर आहे. करवाचौथच्या शुभेच्छा!' तर प्रियांकाने फोटो शेअर करत म्हणले आहे की, 'आम्ही निकच्या कॉन्सर्टच्या ठिकाणी करवाचौथ साजरी केली. आमची ही पहिली करवाचौथ कायम माझ्या लक्षात राहील.' प्रियांकाने लाल रंगाची साडी, बांगड्या, कुंकू लावले आहे. तर निकने पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातला आहे. दोघंही आनंदात दिसत आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Mumbai Loksabha: वर्षा गायकवाडांना निवडणूक जाणार कठीण? या कारणामुळे नसीम खान नाराज

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Latest Marathi News Live Update : 11 दिवसानंतर मतदानाची आकडेवारी कशी आली; संजय राऊतांचा आरोप

SCROLL FOR NEXT