Vivek Agnihotri announces 'The Kashmir Files Unreported after iffi jury controversy sakal
मनोरंजन

Vivek Agnihotri: 'इफ्फी'वादानंतर मोठी घोषणा! आता बनवणार 'द कश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड'

'इफ्फी' चित्रपट महोत्सवातब 'द कश्मीर फाइल्स'वर टीका केल्यानंतर विवेक अग्निहोत्री यांनी ट्विट करत ही घोषणा केली.

नीलेश अडसूळ

53 वा (इफ्फी) भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (International Film Festival of India) नुकताच गोव्यात पार पडला. यावेळी 'इफ्फी'चे ज्यूरी नदाव लॅपिड (Nadav Lapid) यांनी 'द कश्मीर फाइल्स' सिनेमासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यानंतर मोठा वाद पेटला आहे. या चित्रपटात वास्तव दाखवलं की रंजकता यावरून अनेकजण आपले मत व्यक्त करत आहेत. अखेर यावर 'द कश्मीर फाइल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी मोठे वक्तव्य केले आहे. एक ट्विट करत त्यांनी ही घोषणा केली.

(Vivek Agnihotri announces 'The Kashmir Files Unreported after iffi jury controversy)

या फेस्टिवल मध्ये नवाद म्हणाले होते,"द कश्मीर फाइल्स' या सिनेमाचा 'इफ्फी' सारख्या महोत्सवात समावेश होणं ही धक्कादायक बाब असून हा प्रपोगंडा आणि वल्गर सिनेमा आहे'. यावरुन सध्या मोठा वाद सुरू आहे. मनोरंजन विश्वासह राजकीय विश्वातूनही यावर प्रतिक्रिया येत आहेत. या वादादरम्यान दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी मोठी घोषणा केली. एक ट्वीट करत 'द कश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड' (The Kashmir Files Unreported) ही डॉकयू सिरिज म्हणजेच महितीपटांची मालिका ते बनवणार असल्याची माहिती दिली आहे. 

द कश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड' हा एक माहितीपट असणार आहे. यामध्ये जगासमोर न आलेल्या कित्येक गोष्टींचा उलगडा विवेक अग्निहोत्री करणार आहेत. माझ्याकडे इतकी माहिती आहे, इतके पुरावे आहेत की 10 चित्रपट बनवू शकतो. तरीही मी एकाच बनवला. पण ही घटना किती सत्य आहे ही तुम्हाला बघायचच असेल तर आता तेही दाखवतो, असेही म्हणाले. म्हणूनच त्यांनी ही घोषणा केली.

11 मार्च 2022 रोजी प्रदर्शित झालेला 'द कश्मीर फाइल्स' हा सिनेमा नव्व्दच्या दशकात काश्मीर खोऱ्यातील पंडितांच्या हत्येच्या आणि अमानुष अत्याचारांच्या घटणांचे वर्णन करणारा आहे. विवेक अग्निहोत्री यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटाने जवळपास 250 कोटींचा गल्ला जमवला. आता 'द कश्मीर फाइल्स'च्या 'इफ्फी' येथील टिकेनंतर विवेक अग्निहोत्री यांनी द कश्मीर फाइल्स'चा पुढचा भाग 'द कश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड' बनवणार असल्याची घोषणा केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK: भारतीय खेळाडूंना पाकिस्तानविरुद्ध जबरदस्तीने खेळावं लागलं, BCCI...; दिग्गज खेळाडूचा खळबळजनक दावा

Akola News : बंजारा व लभाण समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देवू नका; अकोल्यात बिरसा क्रांती दलतर्फे जिल्हा कचेरीवर भव्य मोर्चा

Latest Marathi News Updates : "हा तकलादू जीआर सुप्रीम कोर्टात टिकणार नाही"- सुजात आंबेडकर

Kej Heavy Rain : केज तालुक्यात पावसाचा हाहाकार! नदी-नाल्यांच्या पाण्याने केले उग्र स्वरूप धारण, केकाणवाडी पाझर तलाव फुटला

Supreme Court warn Election Commission : बिहार 'SIR'वरून सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिला इशारा अन् म्हटलं...

SCROLL FOR NEXT