Dream Sakal
मनोरंजन

सोनेरी स्वप्नं - भाळी चिकटले पाप!

टेरेसवरच्या दाराच्या फटीतून पाणी टपकायला लागलं

नितीन थोरात

‘सोमवारी लय बेक्कार पाऊस झाला रे. टेरेसवरच्या दाराच्या फटीतून पाणी टपकायला लागलं होतं. विजा तर असल्या कडाडत होत्या की घरात झोपलेलं कुत्रंही दचकत होतं. बिचारं थरथरत गादीवर झोपलं. त्याच्या अंगावर ब्लँकेट टाकलं तेव्हा कुठं ते शांत झालं.’

‘तुझं तर काहीच नाय. माझी तर कार घराखालच्या पार्किंगमध्ये निम्मी बुडाली होती. त्यात माझ्या लेकीचा हट्ट चाललेला की मला गाडीवर बसवा, मला रिल्स बनवायचाय. मग काय गेलो पार्किंगमध्ये अन् बसवलं लेकीला गाडीवर. लेकीची हौस झाली पण मी साला सगळा भिजलो रे.’

मी आणि मित्र दोघंही बसस्टॉपला थांबल्या थांबल्या आपापल्या कहाण्या सांगत होतो. आमच्यासमोर हात करून थांबलेला पोऱ्या आमचे अनुभव मन लावून ऐकत होता. मित्रानं त्याच्या हातावर रुपयाचा ठोकळा टेकवला तसा तो पोरगा पळून गेला. आम्ही तिथून चहा प्यायला हॉटेलमध्ये गेलो. तर तो तिथंही आला. त्याच्यासोबत एक लहान मुलगी होती. ‘मगाशी दिले ना तुला पैसे? परत आला होय पैसे मागायला?’ मी असं दरडावलं तसा तो केविलवाणा चेहरा करत म्हणाला, ‘पैशे नाय. तुमची गोष्ट ऐकायला आणलं तायडीला.’

आमच्या दोघांच्याही चेहऱ्यावर प्रश्नच उभा राहिला. मी हसत म्हणालं, ‘गोष्ट? कसली गोष्ट?’ तसा तो पोरगा निरागस चेहरा करत म्हणाला, ‘तुम्ही आत्ता सांगत होता ना पावसाची गोष्ट. ती सांगा ना परत. माझ्या बहिणीला ऐकायचीया. तिलाबी आवडलं.’ तसा माझा गोंधळच उडाला. मी म्हणालो, ‘अरे बाबा ती गोष्ट नव्हती. आम्ही दोघं त्या पावसात आमच्या घरी काय घडलं ते सांगत होतो. तू पण परवा पावसात भिजला असशील ना?’ मी असं म्हणताच पोराचं तोंड पडलं. त्यानं शेजारच्या ओढ्याकडं पाहत बळजबरी स्मित केलं आणि म्हणाला, ‘हा थोडासा भिजलो.’ तसा जोडीदार ओढ्याकडं पाहत म्हणाला, ‘ओढ्याकडं का बघतोय? ओढ्यात गेलता का काय वाहून? जोडीदाराच्या या वाक्यावर त्या लेकरानं पुन्हा ओढ्याकडं पाहिलं आणि हताश नजरेनं म्हणाला, ‘मी नाय गेलो वाहून. पण आमचं घर गेलं.’

ओढ्यातल्या बाभळीला पिवळा तळवट अडकला होता. त्या तळवटाकडं बघताना पुढं काय बोलावं तेच उमजलं नाही. दोन्ही निरागस लेकरं लुकलुकत्या डोळ्यांनी आमच्याकडं पाहत होती. निरागस लेकरांच्या भावनांसोबत खेळल्याचं पाप आमच्या हातून घडलं होतं. त्या पापाची लागलेली टोचणी तेव्हापासून अजूनही सलतेच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Theft : लॉकरचा पासवर्ड चोरला अन् १७ हजार डॉलर्सवर मारला डल्ला; पुण्यात ऑफिस बॉयचा कारनामा!

Weekend Special Recipe: वीकेंडला घरीच १५ मिनिटांत बनवा हॉटेल स्टाइल 'तंदूर पनीर टिक्का', सगळ्यांचं तोंडात पाणी सुटेल

आजचे राशिभविष्य - 10 जानेवारी 2026

Makar Sankranti 2026: मकर संक्रांतीला काळे कपडे का घातले जातात? कारण ऐकून थक्क व्हाल!

Panchang 10 January 2026: आजच्या दिवशी शनि वज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT