web series tandav controversial scene now fir filed in Lucknow cm yogis media advisor.jpg
web series tandav controversial scene now fir filed in Lucknow cm yogis media advisor.jpg 
मनोरंजन

तांडव वरुन 'आकांडतांडव'; हिंदूंच्या भावना दुखावल्या ; दोषींना होणार अटक

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - तांडव वरुन गेल्या चार ते पाच दिवसांपासून जो वाद सुरु आहे त्यात आता दररोज आणखी नवीन घडामोडी होत आहेत. विशेषत भाजपच्या काही नेत्यांनी तांडववर सडकून टीका केली आहे. समाजातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न या मालिकेच्या निमित्तानं करण्यात आला आहे असा आरोप त्यांनी केला आहे. दुसरीकडे दरवेळी हिंदू धर्मालाच का लक्ष्य केले जाते असा प्रश्न यानिमित्तानं समोर आला आहे.

तांडव मालिकेच्या विरोधात आता लखनौमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे माध्यम सल्लागार यांनी यापुढील काळात दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगून त्यांच्या अटकेची तयारी सुरु केली आहे. असे सांगितले आहे.  मालिकेत हिंदू विरोधी आक्षेपार्ह आशय सादर केला गेला आणि त्यातून सर्वसामान्य हिंदू बांधवांचा अपमान झाल्याचे म्हटले आहे. जेव्हापासून 'तांडव' प्रसिध्द झाली आहे तेव्हापासून वाद समोर येत आहेत. त्यातील कलाकारांना प्रचंड टीका सहन करावी लागत आहे. या मालिकेतील प्रमुख कलाकार सैफ अली खानच्या घराबाहेर पोलिस तैनात करण्यात आले आहे.

सैफ सध्या मुंबईत नसून आपल्या काही चित्रपटांच्या चित्रिकरणासाठी तो शहराबाहेर असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. या मालिकेत हिंदू विरोधी टिप्पणी केली असल्यानं त्यामुळे हिंदू देवदेवतांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे.  आहे. याप्रकरणी आता लखनौत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. लखनौच्या हजरतगंज कोतवाली येथे अ‍ॅमेझॉन प्राइम इंडियाचे ओरिजिनल कंटेंट हेड अरुणा पुरोहित, मालिकेचे दिग्दर्शक अली अब्बास जफर, निर्माता हिमांशु कृष्ण मिश्रा आणि लेखक गौरव सोलंकी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

केंद्रीय पोलिस उपायुक्त सोमण बर्मा यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की हजरतगंज कोतवाली येथून पोलिसांची एक टीम मुंबई येथे जाईल आणि एफआयआरमध्ये ज्यांची नावे आहेत त्यांची चौकशी केली जाणार आहे. एफआयआर दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे माध्यम सल्लागार शलाभ मणि त्रिपाठी यांनी आरोपींना इशारा दिला आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे, 'लोकांच्या भावना दुखावणे कधीही सहन केले जाणार नाही. लवकरच 'तांडव' वादाशी निगडीत आरोपींना अटक केली जाणार आहे. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

LSG vs MI IPL 2024 Live : मोहसीन खानने मुंबईला दिला तगडा झटका

तुम्हाला पत्रावळीवर जेवायची इच्छा झाली आणि तुम्ही वाटोळे करून घेतलं; जितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

Ulhasnagar News : उल्हासनगरातील बेवारस वाहने पालिकेच्या रडारवर; 11 वाहन मालकांकडून 17 हजाराचा दंड वसूल

SCROLL FOR NEXT