Athang webseries Esakal
मनोरंजन

Athang webseries: थरकाप उडवणाऱ्या 'अथांग'ची हवा.. पहिल्याच दिवशी रेकॉर्ड..

सकाळ डिजिटल टीम

Athang: 'अथांग' वेब सिरिजचा ट्रेलर रिलीज होण्यापुर्वी पासूनच या वेब सिरिजची प्रचंड चर्चा रंगली होती. त्यानंतर  ट्रेलर झळकल्यापासून प्रेक्षकांना अनेक प्रश्न पडले आहेत. या वाड्यात नक्की काय गूढ दडले आहे, ही अळवट कोण आहे आणि तिचा सरदेशमुखांच्या वाड्याशी काय संबंध? त्या कड्यामागील रहस्य ? असे अनेक अनुत्तरित प्रश्नाच्या उत्तरांची प्रेक्षकांना उत्सूकता लागलेली होती. त्यामूळे प्रेक्षक या वेब सिरिजची आतुरतेने वाट पाहत होते. 

‘अथांग’ ही सीरिज रिलीज होताच प्रेक्षकांची तिला पसंती मिळाली आहे. या सीरिजने प्रदर्शित झाल्यानंतर काही वेळातच या सिरिजने नवा रेकॉर्ड बनवला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी इतकं रेकॅार्ड ब्रेक करत यश मिळवणारी ही प्लॅनेट मराठी ओटीटीवरील पहिलीच वेबसीरिज ठरली आहे. पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी ‘अथांग’ ही वेब सीरिज पाहिली आहे. या सीरिजचे पहिले दोन भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. ही वेब सिरिज प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे.

अथांग'च्या निमित्ताने तेजस्विनी पंडित पहिल्यांदाच निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. या सीरिजला मिळणारा प्रतिसाद पाहून तेजस्विनी पंडितने एक पोस्ट शेअर केली आहे. त्याबरोबरचं ती म्हणते की, ‘आज माझ्या मनात काय भावना आहेत, त्या मी शब्दांत व्यक्त करूच शकत नाही. निर्माती म्हणून हा माझा पहिलाच प्रोजेक्ट, त्यामुळे हा माझ्यासाठी सुखावणारा क्षण आहे. मात्र याचे सारे श्रेय ‘अथांग’च्या संपूर्ण टीमला जाते. यामागे सगळ्यांचीच मेहनत आहे. प्रेक्षकांच्या खूप सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. प्रेक्षक आता पुढील भागांची आतुरतेने वाट पाहत आहेत.’

प्लॅनेट मराठी ओटीटीवर जयंत पवार दिग्दर्शित 'अथांग' ही वेबसीरिज प्रदर्शित झाली आहे. 'अथांग'मध्ये संदीप खरे, निवेदिता जोशी सराफ, धैर्य घोलप, भाग्यश्री मिलिंद, उर्मिला कोठारे, ऋतुजा बागवे, दीपक कदम, ओमप्रकाश शिंदे, केतकी नारायण, शशांक शेंडे, योगिनी चौक आणि रसिका वखारकर यांच्या यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed : ज्ञानेश्वरी मुंडेंनी केलं विषप्राशन, बेशुद्धावस्थेत नेलं रुग्णालयात; १८ महिन्यांपासून पतीचे मारेकरी मोकाट, अटकेची मागणी

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्राच्या जलवाहतूक क्षमतेचा वापर करून राज्याला आणि देशाला सागरी महाशक्ती बनवण्याच्या दिशेने मोठं पाऊल- देवेंद्र फडणवीस

स्वतः इंग्लिश मीडियममध्ये शिकला, ख्रिश्चन बायको केली आणि आता... बिग बॉस फेम रीलस्टारची रितेश देशमुखवर टीका

'आम्हाला एक गोड मुलगी झालीय...' कियाराने शेअर केली पोस्ट, लेकीच्या जन्मानंतर आई-बाबांचा आनंद गगनात मावेना!

Maharashtra Elections : उत्तर महाराष्ट्र सज्ज! ९७ लाख मतदारांच्या निर्णायक निवडणुकांची पूर्वतयारी

SCROLL FOR NEXT