Why 'Moye Moye' is trending worldwide Esakal
मनोरंजन

Moye Moye Trend: हे 'मोये मोये' आहे तरी काय? का होतंय जगभरात ट्रेंड

'मोए मोए' हे गाणे सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. ते जगभरात का ट्रेंड करत आहे? हे जाणुन घेऊया.

Vaishali Patil

Why 'Moye Moye' is trending worldwide: सोशल मिडिया हे असं व्यासपीठ झालं आहे जिथे कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. कधी कच्चा बदाम तर कधी जानू मेरी जानेमन इतकच नाही तर माझ्या बाप्पानी गणपती आणला या गाण्याचा ट्रेंड आपण सर्वांनीच पाहिला आहे. या व्हायरल होणाऱ्या गोष्टींचा अर्थ देखील लोकांना माहित नसतो.

मात्र यावर अनेक व्हिडिओ व्हायरल होतात आणि नेटकरी त्याचे अनुसरण करत असतात. तर सध्या सोशल मिडियावर एका गाण्याचा ट्रेंड सुरु आहे ते गाणे म्हणजे मोये मोये. सोशल मिडिया उघडल्यानंतर तुम्हाला मोये मोयेचा रिल किंवा मीम दिसला नाही असं होणार नाही. मात्र या गाण्याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का आणि हे गाणे कुणी गायले आहे.

हे व्हायरल गाणे एका सर्बियन गाण्यापासून आले आहे जे TikTok वर प्रचंड लोकप्रिय झाले आणि नंतर इतर विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ते व्हायरल झाले.

सर्बियन म्युझिक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ‘मोये मोये’ ट्रेंड सुरू झाला. या म्युझिक गाण्याच्या नावाबद्दल बोलायचे झाले तर त्याचे नाव आहे 'Dzanum' (डजानम) आहे. हे गाणे सर्बियन गायक तेया डोराने गायले आहे.

(What is Moye Moye trend)

हे गाणे तेजा डोरा यांनी सर्बियन रॅपर स्लोबोदान वेल्कोविक कोबीसोबत लिहिले होते. ती या गाण्याच्या म्युझिक व्हिडिओंमध्येही दिसली आहे. आतापर्यंत या म्युझिक व्हिडिओला यूट्यूबवर 57 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

या गाण्याबद्दल बोलायचे झाले तर हे एक दु:ख व्यक्त करणारे गाणे आहे. हे गाणे अचानक ट्रेंडिंग आणि व्हायरल झाल्यामुळे लोकांनी या गाण्यावर अचानक रील्स बनवायला सुरुवात केली आहे. याची सुरुवात TikTok वरून झाली आणि नंतर Instagram, Facebook आणि YouTube वर या गाण्याचे अनेक रील्स व्हिडिओ बनवले जाऊ लागले जे खुप व्हायरल होत आहे.

(why is India obsessed with Moye Moye?)

विशेष म्हणजे या गाण्यात कुठेही 'मोए मोए' म्हटलेले नाही, तर 'मोजे मोर' म्हटले आहे. मोजे मोर चा अर्थ आहे माझा समुद्र. 'डजानम' नावाचा हा म्युझिक व्हिडिओ पाहिल्यानंतर कळतं की नायिका खूप अडचणीत आहे.

मात्र, सोशल मीडियावर या गाण्यावर फनी रील्स तयार होत आहेत. वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाल्यानंतर यूजर्सनी या गाण्यावरील व्हिडिओही शेअर केले आहेत.

लोकांनी या गाण्यावर इतके रील्स आणि व्हिडिओ बनवले की ते अचानक ट्रेंडिंग होऊ लागले. या गाण्याच्या यशानंतर गायिका तेया डोरा खूप खूश आहे आणि तिने यासाठी चाहत्यांचे आभारही मानले आहेत. संगीताला कुठल्याही सीमा नसल्याचं हे उत्तम उदाहरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT