मनोरंजन

"लग्न टिकावं म्हणून एकटं सोडलं"; रेखाच्या चर्चांवर जया बच्चन यांनी केला होता खुलासा

बिग बी-जया यांच्या लग्नातील सर्वांत आव्हानात्मक काळ

स्वाती वेमूल

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन Amitabh Bachchan आणि अभिनेत्री जया बच्चन Jaya Bachchan यांच्या लग्नाला ४८ वर्षे पूर्ण झाली. ३ जून १९७३ रोजी या दोघांनी लग्नगाठ बांधली होती. 'जंजीर' हा चित्रपट हिट ठरला तर बिग बी हे जया यांच्यासोबत आणि इतर काही मित्रांसोबत लंडनला पहिल्यांदा फिरायला जाणार होते. मात्र बिग बींच्या वडिलांनी लंडनला जायचं असेल तर आधी तिच्यासोबत लग्न करावं लागेल असं म्हटलं. वडिलांच्या आज्ञेचं पालन करत अमिताभ आणि जया यांनी लग्नगाठ बांधली होती. खुद्द बिग बींनीच हा किस्सा सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे सांगितला होता. लग्नानंतर बिग बी आणि जया यांच्या वैवाहिक आयुष्यातही अनेक चढउतार आले. जेव्हा अमिताभ यांचं नाव रेखा Rekha यांच्याशी जोडलं गेलं, तेव्हा वैवाहिक आयुष्यातील सर्वांत मोठं आव्हान जया बच्चन यांच्यासमोर होतं. (When Jaya Bachchan said she left Amitabh Bachchan alone to keep her marriage successful)

बिग बी आणि रेखा यांच्या लिंक-अपच्या चर्चा दररोज माध्यमांमध्ये व्हायच्या. त्यावेळी अमिताभ आणि जया यांचं लग्न झालं होतं. त्या चर्चांमध्ये किती तथ्य होतं हे आजपर्यंत स्पष्ट होऊ शकलं नाही. पण यामुळे जया बच्चन आणि अमिताभ यांच्या नात्यावर परिणाम होणं साहजिक होतं. अशा वेळी, लग्न टिकवण्यासाठी आणि परिस्थिती हाताळण्यासाठी जया यांनी अगदी वेगळा मार्ग अवलंबला होता.

जया यांनी अमिताभ यांना काही काळासाठी एकटं सोडलं होतं. पीपल मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्या, "त्यांना मी काही काळासाठी एकटं सोडलं होतं. तुम्हाला विश्वास असणं फार महत्त्वाचं असतं. मी एका चांगल्या व्यक्तीशी आणि वचनबद्धतेवर विश्वास ठेवण्याऱ्या कुटुंबाशी लग्न केलं होतं. एखाद्याबद्दल खूपच पोझेसिव्ह होणं चुकीचं आहे. आमच्या क्षेत्रात तर गोष्टी इतक्या सहजसोप्या नसतात. अशामुळे एकतर तुम्ही त्या कलाकार वेडं तरी करु शकता किंवा मग तुम्ही समजून त्याला क्षेत्रात पुढे जाण्यासाठी मदत करू शकता. हे करूनही जर तो व्यक्ती तुम्हाला सोडून जात असेल, तर मग तो तुमचा कधीच नव्हता."

अमिताभ आणि जया यांना श्वेता आणि अभिषेक ही दोन मुलं आहेत. बिग बी अभिनय क्षेत्रात अजूनही कार्यरत असून जया यांनी त्यांचा मोर्चा राजकारणाकडे वळविला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अजित पवार बोलतात, माझं काम बोलतं, १५ तारखेनंतर ते बोलणार नाहीत : मुख्यमंत्री फडणवीस

Somnath Temple: सोमनाथ मंदिरावर 1000 वर्षांनंतर असा प्रकाश आणि भव्यता पाहिली नाहीत, पाहा पीएम मोदींचा मंत्रजप व्हिडिओ

Pune Municipal Election : प्रचारातील भोंग्यांमुळे कानाला दडे! नागरिकांसह ज्येष्ठांना त्रास; विद्यार्थीही वैतागले

Pandharpur Accident: पंढरपुरातील पुलावरील भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू; आठजण गंभीर, वाहने २५ फूट खोली नदीत, नेमकं काय घडलं..

Pune Municipal Election : : आवाज वाढला; रविवार गाजला! पदयात्रा, फेरी, घरभेटींवर उमेदवारांचा भर

SCROLL FOR NEXT