karan johar and kareena  
मनोरंजन

शाहरुखइतकं मानधन मागितल्याने करणने करिनाशी धरला होता अबोला

स्वाती वेमूल

अभिनेत्री करिना कपूर खान आणि निर्मात-दिग्दर्शक करण जोहर यांनी बॉलिवूडमध्ये अनेकदा एकत्र काम केलं. हे दोघंही इंडस्ट्रीतील प्रतिष्ठित कुटुंबातून आलेले असून आता पुन्हा 'तख्त' या चित्रपटासाठी एकत्र काम करणार आहेत. मात्र काही वर्षांपूर्वी या दोघांमध्ये मतभेद झाले आणि त्यामुळे जवळपास नऊ महिन्यांहून अधिक काळ ते एकमेकांशी बोलत नव्हते. 'द अनसुटेबल बॉय' या आत्मचरित्रात करण जोहरने हा किस्सा सांगितला. "करिनाने खूप जास्त मानधन मागितलं होतं आणि त्यावेळी मला आर्थिक तोटासुद्धा सहन करावा लागला होता. करिनाचा मुझसे दोस्ती करोगे हा चित्रपट प्रदर्शत झाला होता आणि तेव्हाच मी तिला कल हो ना हो या चित्रपटाची ऑफर दिली होती. त्यासाठी तिने शाहरुख खानला जितकं मानधन मिळतंय, तितकंच मलासुद्धा मिळालं पाहिजे असा अट्टहास धरला होता. मी तिला म्हटलं ते शक्य नाही", असं करणने त्यात सांगितलं. 

"मला खूप दु:ख झालं होतं. मी तिला फोन करत होतो पण तिने फोन उचलला नाही. त्यानंतर लगेचच मी प्रिती झिंटाला ती भूमिका दिली. वादानंतर करिना आणि मी जवळपास वर्षभर बोलत नव्हतो. आम्ही पार्ट्यांमध्ये भेटायचो, पण कधीच एकमेकांशी बोलायचो नाही. तो खूपच मूर्खपणा होता", असं तो पुढे म्हणाला. 

करण जोहरचे वडील न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत असताना करिनाने त्याला कॉल केला. त्यावेळी करिनाने करणची माफीसुद्धा मागितली. त्यानंतर करिनाने धर्मा प्रॉडक्शन्सच्या बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं. 'गुड न्यूज', 'एक मै और एक तू', 'व्ही आर फॅमिली', 'कुर्बान' आणि 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटांमध्ये करिनाने भूमिका साकारल्या. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election: महापालिकेसाठी शिंदे गट सक्रिय, लोकसभा मतदारसंघनिहाय नेत्यांवर जबाबदारी

Kolhapur Youth Clash : कोल्हापुरात स्टेटस्‌वरून खुन्नस, दबा देंगे हर आवाज, जो उंची होगी...; महागडे कपडे, विनानंबर प्लेट दुचाकी...

सॉरी, आम्ही जग सोडतोय! चिठ्ठी लिहून महिलेनं ११ वर्षीय मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी; पती घरातच झोपलेला

Asia Women Hockey: भारत-चीनमध्ये अंतिम फेरीची लढत; आशिया करंडक महिला हॉकी, आज सामना

Nitesh Karale: नितेश कराळे मास्तरांना पवारांच्या भेटीला पोलिस सोडेना, मास्तरांकडून फोनाफोनी सुरू

SCROLL FOR NEXT