Kanchan Mullick third Wedding Sreemoyee Chattoraj
Kanchan Mullick third Wedding Sreemoyee Chattoraj esakal
मनोरंजन

Who is Kanchan Mullick : कोण आहे हा 'कंचन मलिक'? आपल्यापेक्षा २० वर्षे छोट्या अभिनेत्रीशी तिसऱ्यांदा थाटला संसार!

युगंधर ताजणे, सकाळ ऑनलाईन टीम

Who is Kanchan Mullick : सध्या सोशल मीडियावर एक नाव भलतचं ट्रेंड होताना दिसत आहे. ते नाव म्हणजे कंचन मलिक. या नावानं नेटकऱ्यांचे (Kanchan Mullick Latest news) लक्ष वेधून घेतले आहे. गेल्या काही दिवसांपासून कंचन मलिक हे नाव चर्चेत आलं आहे. त्या मागील नेमकं कारण काय हे आपण जाणून घेणार आहोत.

साऊथ विश्वातील प्रसिद्ध अभिनेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कंचननं आता तिसऱ्यांदा लग्न केलं आहे. कंचननं श्रीमोयी चट्टोराज (Wedding Sreemoyee Chattoraj ) यांच्यासोबत लग्न केलं असून त्यांच्या या तिसऱ्या लग्नाची चर्चा आहे. ज्याचे काही व्हिडिओ आणि फोटो नेटकऱ्यांच्या खास प्रतिक्रियेचा विषय आहे. बऱ्याच दिवसांपासून हे दोघेजण एकमेकांना डेट करत असल्याचे दिसून आले आहे. कंचन हा लाल रंगाच्या शेरवानीमध्ये एकदम चमकत आहे.

श्रीमोयी यांनी दिलेल्या माहितीनुसार व्हँलेटाईनच्या दिवशी त्यांनी कोर्ट मॅरेज केले. त्यानंतर ते आता एका महिन्यानंतर मोठ्या उत्साहात लग्न करणार आहेत. जेव्हा हे दोन्ही सेलिब्रेटी वेगवेगळ्या पार्टीजमध्ये दिसायला लागले तेव्हापासून त्यांच्यातील डेटिंगच्या गोष्टी समोर येऊ लागल्या होत्या. कंचनचं वय आता ५३ वर्षांचं आहे. श्रीमोयी ही ३० वर्षांची आहे. त्यांच्यात २० वर्षांचं अंतर आहे.

काही दिवसांपूर्वी कंचन आणि श्रीमोयी चट्टोराज यांना रास उत्सवामध्ये स्पॉट केलं गेलं होतं. सोशल मीडियावर चट्टोराज यांच्या पेजवर काही व्हिडिओ देखील शेयर केले गेले होते. श्रीमोयी चट्टोराज यांच्याशी लग्न करण्यापूर्वी कंचननं यापूर्वी पिंकी बॅनर्जीसोबत लग्न केलं होतं. जी त्यांची दुसरी पत्नी होती. त्यांना एक मुलगाही आहे. श्रीमोयी मुळे त्यांच्या नात्यात कटुता आल्याचे सांगण्यात आले होते.

आनंद बाजारच्या एका रिपोर्टनुसार कंचनचं पिंकीसोबत लग्न होण्यापूर्वी अभिनेत्री अनिंदिता दाससोबत लग्न झालं होतं. ते नातं साडेसात वर्षांपर्यंत टिकलं.त्यानंतर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT