who is Priya Singh girlfriend of accused Ashwajit Anil Gaikwad allegedly running car over her SAKAL
मनोरंजन

Priya Singh: सध्या महाराष्ट्रात चर्चेत असलेली इन्फ्लुएन्सर प्रिया सिंग नक्की आहे तरी कोण?

बॉयफ्रेंडने हत्येचा कट रचल्याचा आरोप प्रियाने केलाय

Devendra Jadhav

Priya Singh Information: प्रिया सिंग हे नाव गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिच्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे तिने तिचा प्रियकर आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (MSRDC) अनिल गायकवाड यांचा मुलगा अश्वजित गायकवाडवर कारने चिरडून हत्या करण्याचा आरोप केला आहे. कोण आहे प्रिया सिंग? जाणून घ्या

प्रिया सिंग आहे कोण?

प्रिया सिंग ही इन्फ्लुएन्सर आहे. प्रिया ही रील्सच्या माध्यमातून सोशल मीडियावर सक्रीय असते. याशिवाय ती फॅशन आणि फिटनेस एक्सपर्ट आहे. ती कंटेट क्रिएशनच्या माध्यमातून सोशल मीडियावर विविध ब्रँडचं प्रमोशन करत असते

प्रियाचे इन्स्टाग्रामवर १ मिलियनपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत.

प्रियाच्या बॉयफ्रेंडने हल्ला करण्याचा केला प्रयत्न

प्रियाने इंस्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये तिच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणा दिसत आहेत आणि ती सध्या रुग्णालयात दाखल आहे. रिपोर्ट्सनुसार, प्रिया गेल्या 4 वर्षांपासून अश्वजीतसोबत रिलेशनशिपमध्ये होती.

मात्र तिचे म्हणणे आहे की, अश्वजीत गायकवाडचे लग्न झाले होते. त्याच्या लग्नाला ४ वर्ष झाले होती. मात्र ही गोष्ट त्याने तिच्यापासून लपवून ठेवली. जेव्हा प्रियाला माहिती मिळाली तेव्हा गायकवाडने तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, असं प्रियाचं म्हणणं आहे.

प्रियाची बॉयफ्रेंडविषयी तक्रार

प्रियाने तिच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे तिला न्याय मिळावा असे आवाहन केले आहे. तिच्या पोस्टमध्ये तिने सांगितले आहे की, तिच्या प्रियकराने तिच्यावर कार चालवली आणि तिला मरण्यासाठी रस्त्यावर एकटी सोडले. तिच्या पोस्टमध्ये अश्वजीतव्यतिरिक्त ठाण्याचे रहिवासी असलेले सागर शेळके, रोमिल पाटील, प्रसाद पाटील याशिवाय गायकवाडचा ड्रायव्हर शिवाच्या नावाचाही उल्लेख केला आहे.

प्रियाने सांगितला घडलेला प्रकार

प्रियाने तिच्या पोस्टमध्ये या घटनेबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. प्रियाच्या पोस्टनुसार, तिच्या प्रियकराने तिला फोन करून एका कार्यक्रमात बोलावले होते. आणि जेव्हा ती त्याला भेटायला गेली तेव्हा तो विचित्र वागू लागला.

यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला आणि प्रिया गाडीतून खाली उतरून निघू लागली. तेव्हा कार चालवणाऱ्या व्यक्तीने तिला चिरडण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर ती पडली आणि पडल्यामुळे तिच्या पोटावर, हातावर, पाठीवर जखम झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Update: पावसाचा हाहाकार! पुढील 5 दिवस काळजीचे... या जिल्ह्यांना रेड अलर्ट! मुंबई-पुण्याची परिस्थिती कशी असेल?

PM मोदी जगातले सर्वात लोकप्रिय नेते; ट्रम्प अन् मेलोनींच्या रँकिंगमध्ये घसरण; कोण कितव्या स्थानी?

Child End Of Life : शाळा का चुकवतोस आईनं विचारलं, मुलाने थेट गळफासचं घेतला; नेमकं काय चुकलं

Latest Maharashtra News Updates : कऱ्हाडजवळ आजपासून महामार्गावर एकेरी वाहतूक, उड्डाणपुलाचे गर्डर उतरविण्यासाठी नियोजन

Latur Crime: ‘एचआयव्ही’बाधित मुलीवर अत्याचार; चार महिन्यांनी गर्भपाताचा आरोप, सहा संशयितांविरुद्ध गुन्हा

SCROLL FOR NEXT