the kashmir files_Jhund 
मनोरंजन

'काश्मीर फाईल्स' टॅक्स फ्री केला 'झुंड' का नाही?; निर्मात्याचा सवाल

झुंडच्या निर्मात्यांपैकी एक असलेल्या सविता राज हिरेमठ यांनी हा सवाल उपस्थित केला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला दि काश्मीर फाईल्स या सिनेमांनं १०० कोटी रुपये कमाईचा टप्पा ओलांडला आहे. सन १९९० मध्ये झालेल्या काश्मीरी पंडितांच्या विस्थापन घटनेतवर आधारित हा सिनेमा आहे. भाजपशासित राज्यांनी हा सिनेमा टॅक्स फ्री देखील केला. पण यावर आता झुंड सिनेमाच्या निर्मात्या सविता राज हिरेमठ यांनी सवाल उपस्थित केला आहे. (Why is the Kashmir Files tax free and not ours questions Jhund producer)

हिरेमठ यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून आपलं म्हणणं मांडलं आहे. त्यांनी म्हटलं, "मी नुकताच कश्मीर फाईल्स हा सिनेमा पाहिला. काश्मिरी पंडितांची स्थितीवरील चित्रण खूपच हृदयद्रावक आहे. दि कश्मिर फाईल्स हा महत्वाचा सिनेमा असला तरी झुंड हा पण कमी नव्हता. कारण झुंड हा देखील महत्वाचा चित्रपट असून या सिनेमाची कथा आणि त्यातून मोठा संदेश देण्यात आला आहे. ज्याचं लोकांनी तोंडभरुन कौतुक केलं आहे"

आपलं म्हणणं मांडताना हिरेमठ यांनी सरकारकडून सिनेमा टॅक्स फ्री करण्यामागील निकष काय असतात हे आपल्याला जाणून घ्यायला आवडेल असंही म्हटलं आहे. तसेच आपल्या कर्मचाऱ्यांना सिनेमे पाहण्यासाठी कामातून हाफ डे देण्यामागील त्यांची भूमिका काय असते, हे ही जाणून घ्यायचं आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, झुंड सिनेमाचा विषय देखील देशाच्या विकासासाठी महत्वाचा आहे. हा सिनेमा केवळ जात आणि आर्थिक विषमतेवर बोलत नाहीतर समाजातील दुर्षक्षित घटकाच्या विजयाची यशोगाथा देखील मांडतो.

नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड हा सिनेमा ४ मार्च रोजी प्रदर्शित झाल्यानंतर एका आठवड्यानं विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'दि काश्मीर फाईल्स' हा सिनेमा प्रदर्शित झाला. पण दमदार कथा असतानाही काश्मिर फाईल्सच्या तुलनेत झुंड हा सिनेमा मोजकीच कमाई करु शकला. तर काश्मिरी पंडितांच्या विस्थापनावर आधारित काश्मिर फाईल्सचं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रमोशन केल्याचा आरोप विरोधकांनी केला. तसेच भाजपशासित राज्यांनी 'दि काश्मीर फाईल्स' हा सिनेमा टॅक्स फ्री केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

Record Breaking : १० चौकार, १२ षटकार! ३५३ च्या स्ट्राईक रेटने शतक; ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भीमपराक्रम, २९ धावांत ९ गेल्या तरी संघ जिंकला

Latest Marathi News Updates : जयंत पाटील हे घाबरणारे नेते नाहीत - रोहित पवार

SCROLL FOR NEXT