Raj Thackeray–Sanjay Raut Meeting
esakal
राज्यात मनपा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. निवडणूक आयोगाने या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यानुसार आगामी १५ जानेवारी रोजी एकाच टप्प्यात राज्यातील २९ मनपाच्या निवडणुका होणार आहेत. या घोषणेनंतर आता राजकीय घडमोडींनाही वेग आला आहे. जागा वाटपासंदर्भात राजकीय नेत्यांमध्ये बैठकींचं सत्र सुरु आहे. विशेष म्हणजे यंदा शिवसेना ( उद्धव ठाकरे गट) आणि मनसेच्या युतीची देखील जोरदार चर्चा आहे.