The Kerala Story, The Kerala Story box office, the kerala story full movie SAKAL
मनोरंजन

अवघ्या नऊ दिवसांत The Kerala Story ने कमावले १०० कोटी! प्रचंड विरोध होऊनही सिनेमाची भरघोस कमाई

वघ्या ९ दिवसात द केरळ स्टोरीने केलेली कमाई ही बॉलिवूड सिनेमांना दिलासादायक ठरली आहे

Devendra Jadhav

The Kerala Story Box Office Update: 'द केरळ स्टोरी' सिनेमा सध्या भारतातच नव्हे तर जगभरात चर्चेत आहे. आता हा सिनेमा केवळ भारतात नाही तर अन्य देशांमध्ये सुद्धा प्रदर्शित होणार आहे.

सुदीप्तो सेन आणि अदा शर्मा अभिनीत चित्रपट 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाच्या कमाईचा आलेख दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आसपास प्रचंड विरोध होऊनही 'द केरळ स्टोरी' स्टोरीने बंपर कमाई केलीय.

(Within 9 days of the kerala stroy theatrical release, the movie has entered the Rs 100-crore club)

5 मे ला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला रिलिज होऊन आता ९ दिवस झाले आहेत. या सहा दिवसात 'द केरळ स्टोरी' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली आहे. द केरळ स्टोरीची अवघ्या ९ दिवसात १०० कोटी क्लबमध्ये दिमाखात एंट्री झालीय.

निश्चितच या चित्रपटाच्या यशाचं श्रेय त्याच्या कथेला आणि त्याभोवती निर्माण झालेल्या वादाला जाते आहे. केरळ स्टोरीला सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात माऊथ पब्लिसिटी मिळत आहे.

 'द केरळ स्टोरी' ने पहिल्या बुधवारी म्हणजेच रिलीजच्या 6 दिवशी देखील बंपर कमाई केली होती. या चित्रपटाने बुधवारी चांगलीच एकाच दिवसात 12 कोटींची कमाई केली.

मंगळवारपेक्षा त्यात 10% वाढ नोंदवली गेली. त्यामुळे अवघ्या ९ दिवसात द केरळ स्टोरीने केलेली कमाई ही बॉलिवूड सिनेमांना दिलासादायक ठरली आहे

एकीकडे भारतात अनेक राज्यात चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी होत असतांनाच दुसरीकडे निर्मात्यांनी द केरळ स्टोरी या चित्रपटाला इतर देशांमध्येही प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.

आता हा चित्रपट आणखी 37 देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सिनेमातील प्रमुख अभिनेत्री अदा शर्मानं स्वत: ही माहिती पोस्ट शेअर करत दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

आमिर खान यांना 'सितारे ज़मीन पर' च्या प्रचंड यशानिमित्त देशभरातील एग्झिबिटर्सकडून विशेष सन्मान!

कॅन्सरग्रस्त दीपिका कक्करला भेटायला पोहोचली मराठमोळी सोनाली कुलकर्णी; दोघींचा नेमकं नातं काय?

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

SCROLL FOR NEXT