मनोरंजन

'आई चूकली असेल, म्हणून तिला'...चेतनच्या वीर दासला कानपिचक्या

जागतिक पातळीवर आपल्या साहित्यानं तरुणाईच्या मनाचा वेध घेणारा लेखक म्हणून चेतन भगतचे नाव प्रसिद्ध आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - जागतिक पातळीवर आपल्या साहित्यानं तरुणाईच्या मनाचा वेध घेणारा लेखक म्हणून चेतन भगतचे नाव प्रसिद्ध आहे. त्याचा चाहतावर्गही मोठा आहे. भारतात जन्माला आलेल्या चेतन भगतनं परदेशात व्यवसाच्या निमित्तानं स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. आता तो प्रोफेशनल रायटर आहे. त्याच्या पुस्तकांना लाखोंचा खपही आहे. त्याच्या प्रतिक्रियांची जागतिक पातळीवर दखलही घेतली जाते. सध्या प्रख्यात कॉमेडियन वीर दासची चर्चा सगळीकडे आहे. त्यानं भारताविषयी केलेली कविता सर्वांच्या चर्चेचा विषय आहे. त्यामध्ये भारतातील गरिबी, भ्रष्टाचार, प्रदुषण, स्त्रीयांचे प्रश्न, याशिवाय राजकीय, सामाजिक परिस्थितीवर भाष्य केले होते.

ज्यावेळी अमेरिकेतील एका शहरामध्ये वीर दासनं त्याची कविता सादर केली. त्यावेळी सोशल मीडियावरुन त्याच्या या कवितेची दखल घेण्यात आली होती. त्यावर टीकाही झाली. अनेकांनी त्याला शिव्यांची लाखोलीही वाहिल्याचे दिसून आले आहे. वीर दासनं देखील त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. आपण केवळ सध्याच्या काळात देशामध्ये काय चालले आहे याकडे लक्ष केंद्रित केले होते. माझ्या मनात जे दोन देश आहेत त्याचे चित्रण मी कवितेच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केल्याचे वीर दासनं सांगितले होते. त्यावर चेतननं त्याची चांगलीच कानउघाडणी केली आहे.

वीर दासला चेतन भगत म्हणतो, भलेही आई चूकली असेल मात्र मी तरी इतर कुणाजवळ बोलणार नाही. त्याचप्रमाणे मला माझ्या देशात शंभर चूकीच्या गोष्टी दिसल्या असतील मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवरुन मी त्या मांडणे चूकीचे आहे. अशी प्रतिक्रिया चेतननं वीर दासचे नाव न घेता दिली आहे. मात्र अनेकांना त्यानं कुणाची कानउघाडणी केली आहे हे लक्षात आले आहे. मी तरी माझ्या देशावर जाहीरपणे कुठेही टीका करणार नाही. असे चेतननं म्हटलं आहे. चेतननं केलेल्या व्टिटला देखील नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT