

Ghatkopar landslide mumbai
esakal
Ghatkopar Landslide in Mumbai : घाटकोपरमधील गौसिया चाळ परिसरात बुधवारी (ता.१२) पहाटे दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली. मुसळधार पावसामुळे पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक आमदार दिलीप लांडे यांनी दिली. दरड ५ ते ६ घरांवर कोसळल्याने मोठे नुकसान झाले असून ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.