Yami Gautam Instagram
मनोरंजन

यामी गौतमचं इन्स्टाग्राम अकाऊंट 'हॅक'; पोस्ट करत चाहत्यांना केलं सावधान

सध्या यामी गौतम तिच्या 'दसवी' सिनेमाच्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहे.

प्रणाली मोरे

अभिनेत्री यामी गौतम(Yami Gautam) ' दसवी'(Dasvi) सिनेमात तिनं साकारलेल्या व्यक्तीरेखेमुळे सध्या चर्चेत आहे. सध्या ती या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये भलतीच बिझी दिसतेय. आता बातमी कानावर पडलीय की, यामी आपल्या इन्स्टाग्राम(Instagram) अकाऊंटवर कोणतीही पोस्ट करु शकत नाहीय. कदाचित यामीच्या अकाऊंटला हॅक केलं गेल्यानं तिला ही अडचण उद्भवतेय असं म्हटलं जात आहे.

इन्स्टाग्रामवर यामीला आलेल्या समस्येविषयी तिनं तिच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवर पोस्टच्या माध्यमातून सांगितलं आहे. तिनं ट्विटरवर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे,''मी माझ्या चाहत्यांनाच नाही तर समस्त नेटकऱ्यांना हे सूचित करू इच्छिते की,दोन दिवसांपासून मी माझ्या इन्स्टाग्राम अकाऊंटला ओपन करु शकत नाहीय. कदाचित ते हॅक करण्यात आलं आहे. मी यावर लवकरात-लवकर तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत आहे. पण त्यादरम्यान माझ्या अकाऊंटवरनं जर काही चुकीचं पोस्ट केलं गेलं तर याबाबतीत मी आधीच तुम्हा सर्वांना सावधान करीत आहे''. गेल्या काही दिवसात अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींचे अकाऊंट हॅक करण्यात आल्याची बातमी होती. त्यात फेब्रुवारी महिन्यातच नोरा फतेहीचं इन्स्टाग्राम पेज हॅक केलं गेलं होतं. तेव्हा नोरानंही याविषयी माहिती देणारं एक अधिकृत निवेदन जाहिर केलं होतं.

यामी गौतम लवकरच आपल्याला 'दसवी' सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात ती एका पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. या फॅमिली ड्रामात अभिषेक बच्चन(Abhishek Bachchan) अशिक्षित राजकारणी गंगाराम ही व्यक्तिरेखा साकारत आहे. त्याला एका भ्रष्टाचाराच्या केसमध्ये न्यायालयीन कोठडीत ठेवलं जातं. तेव्हा जेलमध्ये तो कामापासून वाचण्यासाठी अभ्यास सुरु करतो आणि जेलमध्येच दहावीच्या परिक्षेचा फॉर्मदेखील भरतो. या सिनेमात यामी आणि अभिषेक सोबतच दिसणार आहे अभिनेत्री निमरत कौर. निमरतने अभिषेकच्या बायकोची भूमिका केली आहे. नवरा जेलमध्ये गेल्यानंतर तिच त्याची राजकीय गादी आणि मुख्यमंत्री पदाची धुरा देखील सांभाळते. असं इंट्रेस्टिंग कथानक या सिनेमाचं आहे. 'दसवी' सिनेमाव्यतिरिक्त यामी 'लॉस्ट','ओह माय गॉड' मध्ये देखील दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT