yo yo honey singh
yo yo honey singh Sakal
मनोरंजन

Honey Singh Birthday: हनी सिंगने फक्त गाडीच्या नंबरसाठी खर्च केलेले 28 लाख, मात्र आजारपणात...

सकाळ डिजिटल टीम

आपल्या म्युझिकने देशभरातच नव्हे, तर जगभरात नाव कमावणारा प्रसिद्ध रॅपर आणि गायक हनी सिंह आज आपला ४०वा वाढदिवस साजरा करत आहे. यो यो हनी सिंगचा संपूर्ण देश चाहता आहे. आपल्या चाहत्यांना 'अंग्रेजी बीट' शिकवणाऱ्या हनी पाजीने पंजाबी म्युझिक इंडस्ट्री तसंच बॉलीवूड चित्रपटांना असा 'लव्ह डोस' दिला की सगळ्यांनाच त्यांच्या गायकीची खात्री पटली. एक काळ होता जेव्हा हनी सिंगच्या गाण्यावर अवघी तरुणाई थिरकत होती.

हनी सिंगनं आपली गाण्याच्या हटके स्टाइल आणि स्वॅगमुळे स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अफाट लोकप्रियता तर मिळालीच, याशिवाय ऐश्वर्यही मिळालं. मात्र हनी सिंग जेव्हा आजारी पडला तेव्हा त्याला त्याच्याकडच्या सर्व गोष्टी विकाव्या लागल्या होत्या.

हनी सिंह आजारपणातून बरं झाल्यानंतर पुन्हा कामाला लागला आहे. हनी सध्या तो 'याई रे'चं या त्याच्या म्युझिक व्हिडिओचं प्रमोशनात व्यग्र आहे. हनी सिंगनं या निमित्तानं काही गोष्टींचा खुलासा केला आहे.

मुलाखतीमध्ये हनीला गाड्यांच्या प्रेमाबद्दल विचारण्यात आलं. त्याने सांगितले की आता त्याला गाड्यांचा शौक राहिलेला नाही. हनी सिंहला एकेकाळी महागड्या गाड्या विकत घेण्याची प्रचंड आवड होती.

मुलाखतीत हनी सिंगने सांगितले की, जेव्हा त्याने ऑडी आर ८ ही गाडी विकत घेतली होती. त्याने त्या गाडीच्या स्पेशल नंबर प्लेटसाठी तब्बल २८ लाख रुपये खर्च केले होते. तो म्हणाला की, 'आर ८ होती माझ्याकडे, मी गाडीसाठीचा खास नंबर महाराष्ट्रातून विकत घेतला. हा नंबरही आर ८ होता, मी त्यासाठी २८ लाख रुपये खर्च केले होते.'

हनी सिंगने सांगितले की 'जेव्हा मी आजारी पडलो तेव्हा मी सर्व गाड्या विकून टाकल्या.' गाडी चालवू शकत नव्हतो. त्यानंतर आता गाडी चालवण्याची इच्छाच संपली. आता मी गाडी चालवत नाही.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : सत्ता नसतानाही विकास करता येतो

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानासाठी परदेशातील पुणेकर शहरात दाखल

Loksabha Election 2024 : बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार ; एकूण ५९.५० टक्के मतदान,पुरुषांचा टक्का वाढला, महिलांचा प्रतिसाद कमी

Latest Marathi News Live Update : महिला अपहरणप्रकरणी रेवण्णा यांना सात दिवसांची न्यायालयीन कोठडी

SCROLL FOR NEXT