yo yo honey singh
yo yo honey singh  Team esakal
मनोरंजन

हनी सिंगच्या पत्नीने मागितले १० कोटी, अनेक महिलांसोबत शरीरसंबंध असल्याचा आरोप

दीनानाथ परब

मुंबई: रॅपर, गायक आणि अभिनेता यो यो हनी सिंग (Honey Singh) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यो यो हनी सिंगवर पत्नी शालिनी तलवारने (shalini talwar) खूप गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये लैंगिक त्रास देणं, घरगुती हिंसाचार आणि मानसिक छळ असे आरोप आहेत. घरगुती हिंसाचार कायद्यातंर्गत हनी सिंगच्या पत्नीने दिल्लीच्या तीस हजारी कोर्टात याचिका दाखल केलीय. ३ ऑगस्टला खटला दाखल केलाय. कोर्टाने हनी सिंगला नोटीस पाठवून २८ ऑगस्टपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे.

या प्रकरणात आता नवीन माहिती समोर आलीय. त्यानुसार, शालिनी तलवारने हनी सिंगकडे नुकसान भरपाईपोटी १० कोटी रुपयाची मागणी केली आहे. 'शेतातल्या जनावरासारखं क्रूर पद्धतीने आपल्याला वागवण्यात आलं' असं तिने म्हटलं आहे. मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी तानिया सिंग यांनी हनी सिंगला नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये नोएडामध्ये दोघांच्या मालकीच्या संयुक्त संपत्तीमध्ये तिसऱ्या पक्षकाराला अधिकार देऊ नका तसेच पत्नीचे दागिने आणि अन्य वस्तु विकू नका असे निर्देश दिले आहेत. शालिनी तलवारच्या वकीलाने ही माहिती दिली आहे.

नवरा हनी सिंग आणि त्याच्या कुटुंबीयांनी अनेकदा माझा शारीरिक, शाब्दीक, मानसिक आणि भावनिक छळ केला असा आरोप शालिनीने केला आहे. नवऱ्याने आपल्याला अनेकदा मारहाण केली. तो आणि त्याचे कुटुंबीय मला शारीरिक इजा पोहोचवतील या भितीच्या छायेखाली मी सतत वावरत होते, असे शालिनीने सांगितले.

नवऱ्याकडून होणाऱ्या या छळामुळे आपण नैराश्यात गेलो तसेच आपल्याला वैद्यकीय मदतीची गरज लागली, असे शालिनी तलवारने म्हटले आहे. तिने नवऱ्यावर फसवणुकीचाही आरोप केला. नवऱ्याचे अनेक महिलांसोबत शरीरसंबंध असल्याचाही तिने आरोप केलाय. दिल्लीत घरभाड्यापोटी हनी सिंगला दर महिन्याला ५ लाख रुपये देण्याचेही आदेश द्यावेत, अशी मागणी तिने याचिकेत केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : कॉँग्रेसने ६० वर्षे देशाला बुडविले ; शिंदे

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

SCROLL FOR NEXT