10 new Covid-19 cases reported in Jalna
10 new Covid-19 cases reported in Jalna 
मराठवाडा

Covid-19 : जालना, नूतनवाडी, शिरनेर, हनुमंतखेडा, कानडीत नवे रुग्ण

सकाळ वृत्तसेवा

जालना  : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सोमवारी (ता.२५) पुन्हा दहा व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने बाधितांचा आकडा ७१ झाला आहे, तर तीन रुग्णांचे अहवाल सलग दोनदा निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली आहे. यात कानडगाव (ता. अंबड) येथील दोन, तर एकजण परतूर येथील ३२ वर्षीय युवकाचा समावेश आहे. 

कोरोनाबधितांवर उपचार करण्यात कोविड हॉस्पिटलमधील डॉक्टरांना यश मिळत आहे. त्यामुळे आतापर्यंत आढळून आलेल्या ७१ पैकी १८ रुग्ण बरे झाले आहेत. बाधितांच्या संख्येत सतत वाढ होत असल्याने चिंता वाढली आहे. रविवारी सात नवे रुग्ण आढळून आल्यानंतर सोमवारी पुन्हा दहा व्यक्तींच्या स्वॅब नमुन्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राठोड यांनी दिली आहे. नव्याने आढळून आलेल्या दहा रुग्णांमध्ये पाच रुग्ण हे जालना शहरातील जुना जालना भागातील एका नामांकित खासगी हॉस्पिटलमधील कर्मचारी आहेत. एक रुग्ण हा एक वर्षाचा मुलगा आहे.

तर जालना तालुक्यातील पीरपिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत असलेल्या नूतनवाडी येथील दोन, अंबड तालुक्यातील शिरनेर येथील एक, मंठा तालुक्यातील हनुमंतखेडा, कानडी येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. एकूण बाधितांपैकी अठरा रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने सध्या कोविड हॉस्पिटलमध्ये ५३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 
 
तीन रुग्ण कोरोनामुक्त 
अंबड तालुक्यातील कानडगाव येथे परतलेल्या तिघांपैकी २९ वर्षीय तरुण त्याच्या ५२ वर्षीय आईचा उपचारानंतरचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्याने त्यांना सोमवारी घरी सोडण्यात आले. परतूर शहरात मुंबईवरून आलेला ३२ वर्षीय तरुणाचा अहवालही निगेटिव्ह आल्याने त्यालाही सुटी देण्यात आली आहे. 
  
कोरोना मीटर 

  • एकूण बाधित - ७१ 
  • बरे झालेले - १८ 
  • उपचार सुरू असलेले - ५३ 
  • मृत्यू - निरंक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : "चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी," अनभिनेते राज नयानी यांचा इशारा

SCROLL FOR NEXT