file photo
file photo 
मराठवाडा

महापालिकेचे 105 सफाई कामगार अपात्र

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद- महापालिकेत 2010 ते 14 या चार वर्षांत लाड-पागे समितीच्या शिफारशीवरून भरती झालेल्या 194 पैकी 105 कामगार अपात्र ठरले आहेत. यासंदर्भातील चौकशी समितीने आपला अहवाल आयुक्तांना सादर केला आहे. त्यात केवळ 88 मजूर पात्र असून दोघांच्या फाइल आढळल्या नसल्याचे नमूद करण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

महापालिकेतील 1124 कर्मचाऱ्यांचे भरती प्रकरण काही वर्षांपूर्वी विधिमंडळात गाजले होते. त्यानंतर लाड-पागे समितीच्या शिफारशींनुसार झालेल्या सफाई कामगार भरतीचा विषय गाजला. 2010 ते 14 यादरम्यान सुमारे अडीचशे जणांची सफाई मजूर म्हणून भरती करण्यात आली होती. त्यात मूळ वारसांना डावलून संबंध नसलेल्या व्यक्तींना नोकरीवर घेतल्याचे आरोप झाले. त्यामुळे राज्य सरकारने याप्रकरणी सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांची चौकशी समिती नियुक्त केली. मुंडे यांनी महापालिकेत येऊन चौकशी करीत आपला अहवाल राज्य शासनाला सादर केला. त्यात अकरा अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला होता. यातील काही अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे, तर काहीजण निवृत्त झाले आहेत. दरम्यान, महापालिकेने या अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशीची शिफारस केली आहे. दरम्यान, भरती झालेल्या 195 सफाई मजुरांना नोटिसा देऊन चौकशी सुरू करण्यात आली. चार अधिकाऱ्यांच्या समितीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात सुनावणी घेत कर्मचाऱ्यांकडून कागदपत्रे घेतली. चौकशी समितीमध्ये अतिरिक्त आयुक्त डी. पी. कुलकर्णी, उपायुक्त मंजूषा मुथा, मुख्य लेखा परीक्षक दीपाराणी देवताराज, विधी सल्लागार अपर्णा थेटे, आस्थापना अधिकारी विक्रम दराडे यांचा समावेश होता. चौकशी समितीने अहवाल आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्याकडे सादर केला आहे. त्यात 105 कर्मचारी अपात्र ठरल्याचे सूत्रांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT