HSC cheating
HSC cheating 
मराठवाडा

HSC cheating : तीन हजार द्या... उत्तरांच्या झेरॉक्स पुरवतो!

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : ‘दादा...फक्त तीन हजार रुपये द्या! आम्ही मुलांना मटेरीयल पुरवितो. आत्ताच सगळ्या वर्गात उत्तरांच्या चार-चार झेरॉक्स दिल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्याचे टेन्शन घेऊ नका. आम्हालाही परीक्षा सेंटर टिकवून ठेवायचे आहे. चांगला निकाल लावण्यासाठी हा खटाटोप करावा लागतो...’ हा संवाद कुठल्या प्रशिक्षण शिबिरातला नव्हे, तर चक्क बारावीच्या परीक्षा केंद्रावरील एका कर्मचाऱ्याने एका परीक्षार्थी विद्यार्थ्याच्या पालकासोबत केलेला आहे!

बारावी परीक्षेला बुधवारी (ता. २१) सुरवात झाली. पहिलाच पेपर इंग्रजीचा होता. परंतु, पहिल्याच पेपरला बोर्डाने घालून दिलेले सर्व नियम धाब्यावर बसविण्यात आले होते. शहरापासून ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या तुर्काबाद खराडी (ता. गंगापूर) येथील केंद्रावर हा धक्कादायक प्रकार ‘सकाळ’ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये आढळून आला.

शिक्षण मंडळाकडून कॉपीमुक्त अभियानासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. मात्र, या अभियानाला न जुमानता शिक्षक, कर्मचारीच विद्यार्थ्यांना सर्रास कॉपी पुरवीत असल्याचे यंदाही समोर आले आहे. तुर्काबाद खराडी येथील केंद्रावर परीक्षा हॉलमधील कर्मचारी प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचे मोबाइलमध्ये फोटो काढून, हाताने लिहून बाहेर घेऊन येत होते. त्यानंतर बाहेर असलेल्या कर्मचाऱ्याला ते दिले जात होते. अगदी काही वेळातच पुन्हा या प्रश्नांच्या उत्तरांच्या झेरॉक्स प्रती आतमध्ये घेऊन जात होते. त्यासाठी थेट शाळेच्या गेटमधून बाहेर येऊन झेरॉक्स सेंटरवरून कॉप्या घेऊन जात होते. हा सर्व प्रकार घडत असताना प्रशासन आणि परीक्षा यंत्रणांचे मात्र याकडे अजिबातच लक्ष गेले नाही. बैठे पथक नावालाच होते. भरारी पथकही दिसले नाही.

कॉपी पुरविण्यासाठी लहान मुलांचा वापर

बाहेर एक जण सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवून मोठ्या प्रमाणात झेरॉक्स काढून ठेवत होता. परीक्षा हॉलमधून बाहेर येणे शक्य होत नसल्यास लहान मुले खास कॉपी पुरविण्यासाठी ठेवण्यात आली होती. ही मुले थेट परीक्षा हॉलमध्ये जाऊन कॉप्या देऊन बिनधास्त परत येत होती. एक डमी पालक म्हणून ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने या मुलांशी संवाद साधला असता त्याने सांगितले, ‘‘आम्ही कुठल्याही परीक्षा हॉलमध्ये जाऊ शकतो. आम्हाला कोणीही अडवत नाही. तुमचे कोणी नातेवाईक परीक्षेला बसले आहे का? असेल तर सांगा, मी थेट परीक्षा हॉलमध्ये जाऊन कॉपी देऊन येतो. फक्त पाचशे रुपये द्या. त्याचे नाव सांगा, परीक्षा हॉल कोणता ते सांगा, मी मटेरीयल देऊन येतो!’’

‘कुणालाच नापास होऊ देत नाही...’

‘आम्ही कुणालाच नापास होऊ देत नाही. आताच सर्व मुलांना प्रश्नांची उत्तरे देऊन आलोय. तुम्ही पालक आहात ना! प्रत्येक पेपरचे पाचशे रुपये याप्रमाणे सहा पेपरचे तीन हजार रुपये द्या. बाकी काम आमच्यावर सोपवा. तुम्हाला इकडे यायची गरज नाही. आम्ही तुमच्या मुलाला सर्व सहा पेपरला मदत करू.’’ यावर डमी पालकाने विचारले, पकडले गेले तर? त्यावर तेथील एकाने सांगितले, ‘‘बैठे पथक बाहेरच बसलेले असते. ते आत येत नाही. फक्त स्कॉड आला की, लगेच मुलांकडून कॉप्या परत घेऊन टाकतो. स्कॉड गेला की, लगेच त्यांना त्या कॉप्या लिहिण्यासाठी परत करतो.!’’

परीक्षा केंद्रालगतच झेरॉक्स सेंटर सुरू

बारावी परीक्षेच्या अनुषंगाने केंद्राच्या शंभर मीटर परिसरात १४४ कलम लागू करण्यात आले आहे. तरीदेखील या परीक्षा केंद्राच्या अगदी वीस मीटर अंतरावर झेरॉक्स सेंटर बिनदिक्कत सुरू होते. या सेंटरवरून सर्व प्रश्नांची उत्तरे झेरॉक्स काढून मुलांना पुरविण्यात येत होती. तसेच गेटवरच जवळपास २५ ते ३० पालक, शिक्षक एकत्रच बसलेले होते. गेटवर ना पोलिस होते ना सुरक्षारक्षक. त्यामुळे कॉप्यांची ने-आण जोरात सुरू होती.

  • परीक्षा केंद्रावर चक्क कर्मचाऱ्याची पालकाला ऑफर

  • तुर्काबाद खराडीत पहिल्याच पेपरला नियम धाब्यावर

  • भरारी पथके उडाली भुर्रर्र, कॉपीमुक्ती कागदावरच

  • केंद्रावरील बैठे पथक जागचे हललेसुद्धा नाही

  • कॉप्यांची ने-आण जोरात, कुणी हटकलेही नाही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT