arrested
arrested 
मराठवाडा

नांदेड : सट्टा चालविणाऱ्या दोन बुकींना अटक 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : तरोडा परिसरात असलेल्या वैभवनगर भागात एका ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी छापा टाकून सट्टा जुगारावरून दोघांना अटक करून 45 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. भारत विरूध्द वेस्टइंडीज सामन्यावर सट्टा खेळविला जात होता. ही कारवाई बुधवारी (ता. 24) रात्री साडेआठच्या सुमारास केली. 

क्रिकेटचा सामना म्हंटले की लहानापासून ते वृध्दापर्यंत त्याची आवड असते. सध्या हे सामने सुरू झाले आहेत. या सामन्यावर हार- जीतसाठी लाखोंचा सट्टा खेळविल्या जातो. विशेष म्हणजे मेट्रो शहरासारखे अड्डे नांदेड शहरातही सुरू असल्याची गुप्त माहिती सहाय्यक पोलिस निरिक्षक विनोद दिघोरे यांना मिळाली. यावरून त्यांनी पोलिस अधिक्षक संजय जाधव व पोलिस निरीक्षक सुनील निकाळजे यांना माहिती सांगून आपले सहकारी राजू पांगरीकर, जसवंतसिंग साहु, तानाजी येळगे, शेख जावेद, मनोज परदेशी, बालाजी सातपुते महिला कर्मचारी श्रीमती दायवाड व श्रीमती भालेराव आणि घुंगरुसिंग टाक यांना सोबत घेऊन कार्यालयात नोंद करून शासकिय वाहनाने चैतन्यनगर भागात पोहचले. वैभवनगर भागात जयश्री टाकळीकर यांच्या घरात सट्टा सुरू होता. पोलिसांनी सावळा लावून कारवाई केली. यात सुधीर लक्ष्मण पाटील (वय 42) रा. सारफा, रंगारगल्ली, ह.मु. वैभवनगर, नांदेड आणि भगीरथनगर येथील पवन अशोक जाधव (वय 27) या दोघांना अटक केली.

डावावरून पोलिसांनी एक एलईडी टीव्ही, कॅलक्युलेटर, सहा मोबाईल, वेगवेगळ्या कंपनीचे रजिस्टर ज्यात अनेकांचे नावे व रक्कम लिहिलेली आणि रोख 16 हजार असा 45 हजार 100 रुपयाचा मुद्मेमाल जप्त केला. आरोपी पाटील याने हा सट्टा लातूर येथील मलंग सेठ यांना देण्यात येतो असे सांगितले. मुद्देमालासह दोघांना अटक करून भाग्यनगर ठाण्यात आणण्यात आले. एपीआय विनोद दिघोरे यांच्या फिर्यादीवरुन भाग्यनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Mumbai Loksabha: वर्षा गायकवाडांना निवडणूक जाणार कठीण? या कारणामुळे नसीम खान नाराज

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Latest Marathi News Live Update : 10 नक्षलवाद्यांच्या मृतदेहांसह शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त

SCROLL FOR NEXT