मराठवाडा

चुकीच्या माध्यमामुळे गणिताच्या पेपरला दोन तास उशीर

उदयकुमार जोशी

अहमदपूर (लातूर) : महात्मा फुले विद्यालयाच्या दहावी बोर्ड परीक्षा केंद्रावर सोमवारी (ता. 11) सिलबंद लिफाफ्यात  इंग्रजी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका ऐवजी मराठी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका निघाल्याने एकच गोंधळ उडाला. शेवटी बोर्डाकडून प्रश्नपत्रिका आल्यानंतर दोन तास उशीराने परीक्षा सुरू झाली.

महात्मा फुले विद्यालयात दहावी बोर्ड परीक्षेचे केंद्र आहे. याठिकाणी मराठी माध्यमाचे 289, इंग्रजी माध्यमाचे 293, उर्दू माध्यमाचे 22 असे एकुण 604 परीक्षार्थीं परीक्षा देत आहेत. 

सोमवारी सकाळी अकरा ते एक या कालावधीत गणित भाग- एक (बिजगणित)  या विषयाचा पेपर होता. परिरक्षक कार्यालयाकडून गणित भाग- एक या विषयाच्या प्रश्नपत्रिकेची सिलबंद पाकीटे  आल्यानंतर, ती महात्मा फुले विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना वितरीत करण्यासाठी निर्धारीत वेळेत फोडण्यात आली.

मराठी व उर्दू माध्यमाच्या प्रश्नपत्रिका आवश्यक तेवढ्या आल्या. परंतू प्रश्नपत्रिकांच्या पाकीटवर इंग्रजी माध्यम असे लिहले असतानाही त्यात 300 प्रश्नपत्रिका या मराठी माध्यमाच्या निघाल्या.

घडलेला प्रकार विभागीय मंडळाचे सचिव यांना परिरक्षक आर. पी. चव्हाण व महात्मा फुले विद्यालयाचे केंद्रसंचालक एस. आर. जाधव यांच्या मार्फत कळवण्यात आला. त्यानतंर लातूर विभागीय कार्यालयातून  गणित भाग एक (बिजगणित) या विषयाच्या इंग्रजी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका  महात्मा फुले विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर आल्यानंतर दुपारी 12 वाजून 50 मिनिटांनी त्या वाटप करण्यात आल्या. परीक्षार्थींना वाचनासाठीचा दहा मिनीटे वेळ दिल्या नंतर दुपारी एक ते तीन या कालावधीत इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. दरम्यानच्या काळात इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांची पुरेपुर काळजी घेण्यात आली तसेच त्यांना अल्पोपहार देण्यात आल्याचे केंद्रसंचालक एस. आर. जाधव यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

Pune Crime : तळलेल्‍या वाटाण्यात कृत्रिम रंगाचा वापर; ‘एफडीए’ ची ५ ठिकाणी धाड, १९ लाखाहून अधिक रकमेचा साठा जप्त

Jalana Viral Video: दागिन्यावर डोळा, गावकऱ्यांनी भोंदूबाबाला दिला चांगलाच चोप, काय घडलं?

समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंजच्या परिसरात छोट्या विमानाच्या गिरट्या; नेमकं काय घडलं? चर्चांना उधाण...

Satana Suspicious Case : मध्यरात्रीच्या संशयास्पद विधीने खळबळ; जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल, तपास वेगात

SCROLL FOR NEXT