Bus
Bus 
मराठवाडा

१४ मार्गांवर धावणार २५ शहर बस

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - महापालिकेला स्मार्ट सिटी योजनेतून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात २५ बस मिळणार असून, या बस शहरातील १४ मार्गांवर धावणार असून एक बस हेरिटेज पर्यटकांसाठी ठेवण्याचा निर्णय शुक्रवारी (ता.२२) झालेल्या स्मार्ट सिटी परिवहन समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.

स्मार्ट सिटीच्या परिवहन समितीची बैठक डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात घेण्यात आली. त्यानंतर माहिती देताना महापौर म्हणाले, टाटा कंपनीकडून घेण्यात येणाऱ्या शंभर बसपैकी ९० बस रस्त्यावर धावणार असून, १० बस राखीव ठेवण्यात येणार आहेत. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मिळणाऱ्या २५ बस सुरू केल्या जाणार आहेत. या बस १४ मार्गांवर धावतील. एक बस हेरिटेजसाठी पर्यटकांसाठी असेल. संपूर्ण १००

बस मिळाल्यानंतर त्या ३० मार्गावर 
धावतील. त्यातील दहा बस राखीव ठेवण्यात येतील, एक बस शहर दर्शनासाठी सुरू केली जाईल, असा निर्णय घेण्यात आला.

रेल्वेस्टेशन शेजारी होणार आगार 
शहर बससाठी रेल्वेस्टेशन येथे डेपो राहणार आहे. या ठिकाणी महामंडळाची जागा असून, शहागंज येथे मुख्य बसथांबा असेल. या ठिकाणाहून बस सोडण्यात येतील. तिकीट दर एसटी महामंडळाप्रमाणेच राहणार आहेत. 

विद्यार्थांना ६६.६६ टक्के सवलत
विद्यार्थ्यांना तिकीट दरात ६६.६६ टक्के सवलत देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. अपंग व्यक्तींना ७५ टक्के, तर अंशत: अपंग व्यक्तींना ५० टक्के सवलत दिली जाईल. ज्येष्ठ नागरिक व स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिकांना देखील सवलत देण्यासंदर्भात सरकारकडे प्रस्ताव पाठवून त्यास मंजुरी घेण्याचे ठरविण्यात आले.

दरमहा ४० लाखांचे नुकसान 
एसटी महामंडळामार्फत चालविल्या जाणाऱ्या बस तोट्यात आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटीमधून सुरू केल्या जाणाऱ्या बसही तोट्यात जातील अशी शक्‍यता आहे. त्यामुळे दरमहा ४० लाखांचे नुकसान सहन करून सिटीबस चालविली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhima Koregaon Case: भीमा कोरेगाव प्रकरणात ट्विस्ट, दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक हनी बाबू यांनी मागे घेतला जामीन अर्ज

Bollywood News: व्हॅनिटी व्हॅन, स्टायलिस्ट अन् भरमसाठ फी! फिल्मस्टारवर एका दिवसाला किती पैसे होतात खर्च? वाचून व्हाल थक्क

Video: मुलं आजूबाजूला खेळतायेत अन् कपल्सचा पार्कच्या मधोमध 'रोमान्स'; व्हिडिओ पाहून लोकांचा संताप

Latest Marathi News Live Update : स्मृती इरानी यांच्या विरोधात काँग्रेस नेत्याचा अर्ज दाखल

Health Insurance: विमा घेऊनही चिंता कायम! 43 टक्के पॉलिसी धारकांना मिळत नाही क्लेम; धक्कादायक अहवाल समोर

SCROLL FOR NEXT