file photo
file photo 
मराठवाडा

परभणी जिल्ह्यात २५१ संशयीतांची तपासणी

गणेश पांडे

परभणी : परभणी जिल्ह्यात मंगळवारी (ता.२४) नवीन ३९ संशयीत नागरिकांची जिल्हा रुग्णालय व अधिनिस्थ आरोग्य संस्थेत नोंद झाली आहे. कोव्हिड -१९ बाह्य रुग्ण विभागात २५१ संशयीत रुग्णाची तपासणी करण्यात आली आहे. मंगळवारी एकूण ८ रुग्णांचा स्वॉब तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू संस्था पुणे येथे पाठविण्यात आला आहे.

‘कोरोना’ विषाणुचा प्रादुर्भाव झालेला एकही रुग्ण आढळलेला नसला तरी रुग्णांची संशयीत रुग्णांची संख्या मंगळवारी (ता.२४) सायंकाळी घेतलेल्या आकडेवारीत ११३ झाली आहे. ‘कोरोना’ तपासणीसाठी घेतलेल्या ६५ स्वॉब पैकी ३४ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. आजून एक आनंदाची बातमी म्हणजे १५ स्वॉब असे आहेत जे प्रयोगशाळेने तपासणी करण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे.

‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरले आहे. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्यासह पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी परिस्थिती पूर्णपणे सांभाळलेली आहे. मंगळवारी (ता.२४) सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती अधारे जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळपर्यंत कोरोना संशयीताची संख्या ११३ वर गेली आहे. आजपर्यंत घेण्यात आलेल्या ६५ स्वॉब पैकी ३४ स्वॉब निगेटीव्ह आले आहेत. १६ स्वॉबचा अहवाल प्रलंबित आहे. आजतागायत १५ स्वॉबची तपासणी करण्याची गरज नसल्याचे पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेच्यावतीने कळविण्यात आले आहे.


एकूण ५४ जन निगराणी खाली
परदेशातून आलेले ५१ व त्यांच्या सहवासातील तसेच देशातंर्गत ३ असे एकूण ५४ नागरिक निगराणी खाली आहेत.  सदर नागरिकांपैकी १५ नागरिक रुग्णालयात विलगीकरण कक्षामध्ये दाखल आहेत. उर्वरित ९८ नागरिक त्यांच्या घरी विलगीकरण करण्यात आले आहेत. त्यांच्या निवासस्थानी वैद्यकीय पथकामार्फत फेर तपासणी करण्यात येत आहे. त्या ९८ रुग्णाची प्रकृती स्थिर आहे.

मंगळवारी २५१ रुग्णांची तपासणी
नवीन ३९ संशयीत नागरीकांची जिल्हा रुग्णालय व अधिनिस्थ आरोग्य संस्थेत नोंद झाली आहे. कोव्हिड - १९ बाह्य रुग्ण विभागात २५१ संशयीत रुग्णाची तपासणी करण्यात आली आहे. मंगळवारी एकूण ८ रुग्णांचा स्वॉब तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू संस्था पुणे येथे पाठविण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT