school
school 
मराठवाडा

शाळेचे पत्रे कोसळून तीन विद्यार्थीनी जखमी

अनिरुद्ध धर्माधिकारी

आष्टी (जि. बीड) : परिपाठानंतर शाळेतील वर्गखोलीबाहेर रांगोळी काढणार्या मुलींच्या अंगावर पडवीचा खांब सटकल्याने त्यावरील पत्रे कोसळून तीन विद्यार्थिनी जखमी झाल्या. तालुक्यातील टाकळी आमियां येथे आज (ता. तीन) सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. जखमी विद्यार्थिनींना उपचारार्थ कडा येथे हलविण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेच्या टाकळी आमियां येथील शाळेमध्ये आज निवडणूक विभागातर्फे शाळेतील शिक्षकांसाठी इव्हीएम मशीनच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे सकाळी 10 वाजता परिपाठ आटोपल्यानंतर हे प्रात्यक्षिक घेण्यासाठीची तयारी सुरू होती. तर याच वेळी शाळेत रांगोळीच्या स्पर्धा असल्याने एक वर्गखोली रिकामी करून समोर असलेल्या पत्र्याच्या पडवीमध्ये काही विद्यार्थिनी रांगोळी काढत होत्या.
या वेळी अचानक पडवीचे पत्रे उभा करण्यात आलेला खांब सटकून त्यावरील पत्रे खाली कोसळले. काही कळायच्या आत घडलेल्या या घटनेत रांगोळी काढणार्या सविता शिवाजी मिरड (इयत्ता 5वी, वय 10 वर्षे), गायत्री शिवाजी चौधरी (इयत्ता 7वी, वय 13 वर्षे), सानिका संदीप चौधरी (इयत्ता 5वी, वय 10 वर्षे) या तीन मुली पत्रे खरचटल्याने जखमी झाल्या. जखमी विद्यार्थिनींना उपचारांसाठी कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पाठविण्यात आल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक किशोर कस्तुरे यांनी दिली. 

दुरुस्तीसाठीच्या पत्राला उत्तरही नाही
दरम्यान, शाळेचे तत्कालीन मुख्याध्यापक रमेश शेंडगे यांनी शाळेच्या वर्गखोल्यांच्या झालेल्या दुरवस्थेची माहिती सहा महिन्यांपूर्वीच शिक्षण विभागाला कळवून या खोल्यांची तातडीने दुरुस्ती व्हावी अशी मागणी केली होती. मात्र, शिक्षण विभागातर्फे याची कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याची माहिती समोर येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

दलितांच्या जीवनाचं वास्तव चित्रण

SCROLL FOR NEXT