30 years of latur killari earthquake miraculous rescues fear still hounds latur earthquake survivors Sakal
मराठवाडा

Latur Earthquake 1993 : स्थित्यंतराच्या हिंदोळ्यावरील भाग्यरेषा

भूकंपामुळे लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांतील अनेक गावांमध्ये विनाश होत हजारो जण मृत्युमुखी पडले.

जलील पठाण.

औसा : भूकंपामुळे लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांतील अनेक गावांमध्ये विनाश होत हजारो जण मृत्युमुखी पडले. साखरझोपेत असतानाच काळाने घातलेला हा घाला एवढा भयंकर होता की या भूकंपाने येथील लोकांची जीवन जगण्याची पद्धतच बदलून टाकली. आज या घटनेला तीस वर्षे पूर्ण होत असताना या काळात लोकांमध्ये झालेल्या बदलांचा घेतलेला हा आढावा.

किल्लारीपासून सात किलोमीटरवर असलेल्या मंगरूळ या गावाची लोकसंख्या भूकंपावेळी २५०० होती. त्यापैकी भूकंपातील मृतांची संख्या होती ७२८. यामध्ये प्रामुख्याने महिला व लहान मुलांचे प्रमाण अधिक होते. भूकंपाने कुटुंब गमावलेल्या लोकांना खरा आधार दिला तो तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार आणि तत्कालीन महसूल मंत्री (कै.) विलासराव देशमुख यांनी.

आता भूकंपग्रस्तांपुढे जगण्यासाठी पर्याय शोधण्याचे मोठे आव्हान होते. शासनाच्या मदतीवर उभी राहत असलेली मानसिकता नवीन बदल स्वीकारण्यास तयार होत असताना एकीकडे कुटुंबातील व्यक्ती गेल्याने जगण्याची आशा धूसर करीत होती, तर दुसरीकडे जगाच्या प्रवाहात येण्यासाठी मरगळ झटकण्यासाठी प्रेरणा देत होती.

जगभरातून आलेल्या मदतीबरोबरच वेगवेगळ्या संस्कृतीचे बीज पण येथे रोवले जात होते. बाहेरगावांहून आलेल्या बर्मुडा, शाल, चादरी, बिछाने, तंबू, अनेक विद्युत उपकरणे, जीवनावश्यक वस्तूंमधील विविधता याचे नकळत खेड्यातील लोकांवर परिणाम होत गेले.

नवीन चांगले आहे, याची जाणीव त्यांना होऊ लागली आणि नावीन्याचा शोध घेण्याची उत्सुकता या निमित्ताने तरुणाईत निर्माण झाली. पारंपरिक पद्धतीने शेती करणारा शेतकरी आता नवीन अवजारांचा साहाय्याने शेती करू लागला. शेणामातीने व दगडाने बनविलेल्या घरापेक्षा सिमेंट काँक्रीटची घरे सुरक्षित वाटू लागली.

शहरापासून तुटलेली खेडी नवीन रस्त्यांमुळे जोडली गेली. आडवळणावर असलेली अनेक गावे प्रमुख रस्त्यांच्या कडेला आल्याने उद्योगधंदे वाढले, वैचारिक देवाणघेवाण वाढली. विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची दारे मोकळी झाली. वीज रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य सारख्या सुविधांमुळे जीवनात बदल झाला.

किल्लारीला बसलेल्या विनाशकारी भूकंपाला तीस वर्षे उलटून गेली तरी त्यावेळी झालेल्या विनाशाच्या स्मृतींनी अजूनही मन अस्वस्थ होते. शेकडो कुटुंबे या भूकंपामुळे उद्ध्वस्त झाली, हजारो बेघर झाले. त्या घटनेचा, त्यामुळे झालेल्या परिणामांचा, मदतकार्याचा आणि त्यानंतरच्या परिस्थितीचा घेतलेला हा आढावा...

भूकंपानंतर नवीन घेताना मूळ संस्कृतीचा विसर पडत गेला. कुटुंबे विभक्त झाली. त्यामुळे सुख दुःखात एकमेकांना सामावून घेणे कमी झाले. लोक रस्त्याच्या कडेला आले. मात्र माणुसकीचा ओलावा सुकून गेला. शेतीतही स्पर्धा लागल्याने पिकांच्या फेरपालटापासून लोकं दूर गेली. थोड्या कमाईतून वीस माणसांच्या कुटुंबाचा होत असलेला उदरनिर्वाह आता मोठ्या रकमेतून होत नाही. पूर्वी गावे छोटी होती पण लोकांची मने मोठी होती.

- राम जाधव, मंगरूळ (माजी सैनिक) वय ९०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : बस, मेट्रो, लाइट मेट्रोसह १९ उड्डाण पूल; पुणे महानगराचा १ लाख ३३ हजार कोटींचा आराखडा

तीन महिन्यांच्या गर्भवती महिलेने ओढणीने घेतला गळफास; कुटुंबाच्या विरोधात जाऊन दोघांनी केला होता आंतरजातीय विवाह, असं काय घडलं?

पहलगाम हल्ल्यात पतीला गमावलेल्या हिमांशी नरवालची बिग बॉसमध्ये एण्ट्री? मोठी माहिती आली समोर

संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सची साथ वैभव सूर्यवंशीमुळे सोडतोय? १४ वर्षीय फलंदाजाबद्दल कॅप्टन काय म्हणाला वाचा...

Prajakta Mali Net Worth : स्वत:चं कोटींचं फार्महाऊस, दागिन्यांचा ब्रँड अन् बरंच काही...प्राजक्ता माळीची एकूण संपत्ती किती?

SCROLL FOR NEXT