kamgar
kamgar 
मराठवाडा

३५ हजार बांधकाम कामगारांना मिळणार अनुदान, कुठे ते वाचा... 

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली ः जिल्‍ह्यात ३५ हजार बांधकाम कामगार लाभार्थी शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानास पात्र झाले आहेत. त्‍याची माहिती शासनाकडे पाठविण्यात आली असून या लाभार्थींच्या बँक खात्यात प्रत्‍येकी दोन हजार रुपये जमा होत आहेत.

महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार मंडळांतर्गत नोंदणीकृत असलेल्या कामगारांना शासनाकडून दोन हजार रुपयांचा लाभ दिला जातो. त्‍यात जिल्‍ह्यातील ३५ हजार लाभार्थींचा समावेश आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. (ता. २२) मार्चपासून जनता संचारबंदी व त्‍यानंतर सुरू झालेल्या सक्‍तीचा लॉकडाउनमुळे कामगारांना काम उपलब्ध नसल्याने त्‍यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. राज्य शासनाने अशा कामगारांना दोन हजार रुपयांचा लाभ देण्याचा निर्णय घेतला. 

एक एप्रिलपर्यंतचे नोंदणी केलेले कामगार पात्र 
(ता.३१) मार्च २०१९ पर्यत नोंदणीकृत असलेल्या व पुढील काळात नोंदणी केलेल्या तसेच (ता.एक) एप्रिल २०१९ पर्यंत नोंदणी केलेल्या कामागारांना लाभास पात्र ठरविण्यात आले होते. या शिवाय विविध अटीदेखील आहेत. त्‍याची पूर्तता केल्यानंतर कामगारांच्या बँक खात्यावर शासन थेट रक्‍कम जमा करीत आहे. (ता.एक) एप्रिलपर्यंतचे कामगार यासाठी नोंदणीकृत असलेले पात्र ठरविण्यात आले आहेत. जिल्‍हा कामगार कार्यालयाने या बाबतची माहिती शासनाकडे पाठविली आहे.

प्रमाणपत्र मिळत नसल्याने गैरसोय
ज्‍या लाभार्थींनी जिल्‍हा कार्यालयात दस्‍ताऐवज सादर करताना चुकीची माहिती दिली असेल तर अशांना लाभ देण्यासाठी शासन स्‍तरावरून अडचणी निर्माण होत आहेत. जिल्‍ह्यात बहुतांश कामगारांच्या नोंदी झाल्या आहेत. मात्र, नुतनीकरण व कामगार प्रमाणपत्र मिळत नसल्याने अनेकांना या योजनापासून वंचित राहावे लागत आहे. 

नव्याने नोंदणीच्या सूचना नाही 
मागील वर्षभरापूर्वी कामगार कार्यालयाकडून कामगारांना विविध योजनेचा लाभ दिला जात आहे. त्‍यासाठी अनेकजण कार्यालयात नाव नोंदणी करीत आहेत. मात्र, टाळेबंदीमुळे मागील तीन महिन्यांपासून नोंदणी बंद आहे. नव्याने नोंदणी करण्याबाबत अद्यापपर्यंत कोणत्याही सूचना आल्या नसल्याचे जिल्‍हा कामगार कार्यालयातर्फे सांगण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Unnatural Sex: "पत्नीसोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध बलात्कार नाही"; हायकोर्टाचं विधान!

Sharad Pawar: सोडून गेलेल्यांबाबत तडजोड नाही, पवार थेटच बोलले; वाचा महत्वपूर्ण मुलाखत

IPL Toss Fixing : कॅमेरा टॉसकडे जाताच रेफ्री आला मध्ये; मुंबईचा टॉस पुन्हा वादात, व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : मुंबई स्थानकावर अमरावती एक्सप्रेसला किरकोळ आग

SCROLL FOR NEXT